32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकमी मतदानाची झळ कोणाला बसणार.....

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा  वाजेपर्यंत सरासरी ६६.९३टक्के मतदान झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,बिहार,मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांचा मतटक्का हा घटला आहे. आणि त्यातही दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वांत कमी मतदान झाले आहे. २६ एप्रिलला म्हणजेच पहिल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यात त्यात जेमतेम ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. नमस्कार मी सुजाता शिरसाठ-शेकडे ,आपण पाहत आहात लय भारी.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा  वाजेपर्यंत सरासरी ६६.९३टक्के मतदान झाले(Who will suffer from lowest voting). आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,बिहार,मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांचा मतटक्का हा घटला आहे. आणि त्यातही दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वांत कमी मतदान झाले आहे. २६ एप्रिलला म्हणजेच पहिल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यात त्यात जेमतेम ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. नमस्कार मी सुजाता शिरसाठ-शेकडे ,आपण पाहत आहात लय भारी. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, मतदानाला सुरुवात झालेली आहे. अजूनही उमेदवारांचे पक्षांतराचे खेळ सुरुच आहेत. २०२४ ची हि निवडणूक खूप  महत्वाची असणार आहे, ती यासाठी कि यावेळेस मोठ्याप्रमाणात झालेल्या पक्षफुटीमुळे बरेच जुने मैत्र्य असणारे एकाच पक्षातील सोबती आता विरोधक म्हणून एकमेकांच्या आमने-सामने असणार आहेत. पण जर मतदारांचा असा थंड प्रतिसाद असणार असेल तर याची नेमकी झळ कोणाला बसेल, हे पाहणं गरजेचं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी पूर्व विदर्भातील वर्धा आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ-वाशीम, अमरावती,अकोला आणि बुलढाणा या एकूण ५ मतदार संघात रात्री साडे दहा वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ५८.०९ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ५ मतदारसंघांमध्ये सरासरी ६३.७०टक्के मतदान झाले होते , तेच यावेळी राज्यातील मतांचा आकडा ७ टक्क्यांनी घसरला आहे. मराठवाड्यातील परभणी,हिंगोली आणि नांदेड या तीन मतदारसंघात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.७९ टक्के मतदान झाले. मतदारांचा निरुत्साह आणि वाढत्या उन्हाच्या झळा या कमीटक्केवारीला बसल्याअसल्याचं सांगितलं जातंय.  दुसऱ्या टप्प्याचं एकूण मतदान लक्षात घेता महाराष्ट्रात ५८.०९टक्के , उत्तर प्रदेश मध्ये ५४.८५टक्के , बिहार मध्ये ५५.३४ टक्के , मध्यप्रदेशमध्ये ५७.९२ टक्के , कर्नाटकमध्ये ६८.३१टक्के , राजस्थान मध्ये ६४.०७टक्के , प.बंगालमध्ये ७१.८४टक्के , आसाममध्ये ७१.११ टक्के , छत्तीसगढमध्ये ७३.६२ टक्के , जम्मू-काश्मीर मध्ये ७२.०४ टक्के तर केरळमध्ये ६६.१७ टक्के  मतदान झालेले आहे.हे मतदान सुरु असतानाच त्याविषयीच्या अनेक तक्रारी हि आता समोर येताहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील फाळेगाव केंद्रावर ‘मशाल’ चिन्हापुढचे बटण दाबल्यावर व्हीव्हीपॅटमध्ये ‘धनुष्यबाण’ अंकित होत असल्याची तक्रार मतदार नितीन बोन्द्रे यांनी तहसीलदारांकडे केलीये. शिवाय याच शहरातील छोटी गुजरी परिसरात मतदारांच्या बोटावर शाई लावून व त्यांना पैसे देऊन मतदान न करण्याचे आवाहन करताना एका व्यक्तिला पकडण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी