32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयमोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार, 1100 कोटी उभारणार

मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार, 1100 कोटी उभारणार

टीम लय भारी

 नवी दिल्लीः सरकारने मालमत्ता मुद्रीकरण कार्यक्रमांतर्गत तोट्यात असलेल्या BSNL आणि MTNL च्या स्थावर मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती दिपमने दिली आहे(Modi government will sell assets of two companies)

डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) च्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या दस्तऐवजानुसार सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या MTNL आणि BSNL च्या नॉन-कोर अॅसेट कमाईची यादी सुमारे 1,100 कोटी रुपयांच्या राखीव किमतीवर विक्रीसाठी ठेवलीय.

BJP : ‘भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुध्दा ….

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

मुंबई येथे असलेल्या मालमत्ता सुमारे 270 कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी

BSNL च्या मालमत्ता हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे आहेत आणि विक्रीसाठी त्यांची आरक्षित किंमत 800 कोटी रुपये आहे. DIPAM वेबसाईटवर MTNL च्या वसारी हिल, गोरेगाव, मुंबई येथे असलेल्या मालमत्ता सुमारे 270 कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी सूचीबद्ध केल्यात.

नवी मुंबईत भाजपला धक्के पे धक्का ! नगरसेवकांचा BJP ला रामराम, NCP मध्ये केला प्रवेश

‘Captain Amarinder on the Opposition calling PM Modi Aahankaari; reacts to Farm Laws being Repealed’

त्याचप्रमाणे ओशिवरा येथे MTNL चे 20 फ्लॅट देखील कंपनीच्या मालमत्ता कमाई योजनेचा भाग म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. त्यांची राखीव किंमत 52.26 लाख ते 1.59 कोटी रुपये आहे. MTNL मालमत्तेचा ई-लिलाव 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

69000 कोटींच्या पुनरुज्जीवन योजनेचा भाग

मालमत्ता मुद्रीकरण हा 69000 कोटींच्या पुनरुज्जीवन योजनेचा भाग आहे. MTNL आणि BSNL ची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2019 मध्ये या पुनरुज्जीवन योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेनुसार, दोन्ही कंपन्यांना 2022 पर्यंत 37500 कोटी रुपयांची मालमत्ता ओळखून दोन्ही कंपन्यांना विकावी लागेल.

पुनरुज्जीवन योजनेत काय?

BSNL, MTNL च्या 69000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन योजनेंतर्गत 4G स्पेक्ट्रम वाटप आणि मालमत्ता मुद्रीकरण यांचा समावेश करण्यात आलाय. याशिवाय दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएसचा पर्यायही देण्यात आलाय. या दोन्ही कंपन्यांच्या 92700 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतलाय. यामुळे दरवर्षी पगाराच्या रूपात 8800 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे मानले जात आहे.

वर्षानुवर्षे या कंपन्या तोट्यात

याशिवाय दोन्ही कंपन्यांना 2022 पर्यंत 37500 कोटी रुपयांची मालमत्ता विकायची आहे. MTNL बद्दल बोलायचे झाल्यास गेल्या 10 वर्षात कंपनी 9 वर्षांपासून तोट्यात आहे. याशिवाय बीएसएनएलही सातत्याने तोट्यात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी