30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊ गर्दी जमवण्याचा सरकारचा...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला पैसे देऊ गर्दी जमवण्याचा सरकारचा प्रयत्न – अंबादास दानवे

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्यात सभा सुरू आहेत. 12 तारखेला संभाजी नगरला सभा होणार आहे. या सभेला प्रचंड गर्दी व्हावी यासाठी नाना युक्त्या लढवल्या जात आहेत.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्यात सभा सुरू आहेत. 12 तारखेला संभाजी नगरला सभा होणार आहे. या सभेला प्रचंड गर्दी व्हावी यासाठी नाना युक्त्या लढवल्या जात आहेत. या सभेला गर्दी जमवण्याचे प्रयत्न संदीपान भुमरे करत आहेत. नागर‍िकांनी सभेला उपस्थ‍ित रहावे यासाठी पैसे दिले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला जिल्हा परिषद आणि अंगणवाडी सेव‍िकांनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशा आशयाचे परिपत्रक काढण्यात आले आहेत. तसेच सभेला येणाऱ्याला प्रत्येकाला दीड हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सरकार यंत्रणेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच सरकार केवळ आकडयांचा खेळ करत आहे. महापुर आलेल्या भागातील शेतकऱ्यांना 3 हजार कोटींची मदत जाहिर करण्यात आली आहे. ती मदत अजून मिळालेली नाही. अजून अनेक भागात पंचनामे देखील झाले नाहीत. तसेच सरकार आदिवासी बाबत उदासीन आहे. कारण इगतपुरीमध्ये आदिवासी मुलं ही वेठबीगारी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी – शरद पवार

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंचा सर्वोच्च न्यायालयात खटला, तरीही सरन्यायाधिशांसोबत बसतात हे चुकीचे’

Rahul Gandhi : राहूल गांधी जोडताहेत माणसांची हृदये !

नुकतीच एक मुलगी बेठबीगारीमुळे मरणासन्न अवस्थेत सापडली. या घटनेची दखल सरकारने घेतली नाही. तर लव जिहादवरुन नवनीत राणा या राज्यात दंगल माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेली मुलगी रागाच्या भरात गेली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नवनीत राणा याचे राजकारण करत आहेत. सरन्याधीशांसोबत मुख्यमंत्री एका व्यासपीठावर बसतात हे संकेतांना धरून नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आशा प्रकारे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. सरकारच्या विकासाच्या योजना केवळ कागदावरच आहेत.

राज्यात येऊन गेलेल्या महापुरामुळे रस्ते खचले आहेत, पूल वाहून गेले आहेत त्यांना अजून सरकारने मदत जाहिर केलेली नाही. त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारकडे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी