28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयRahul Gandhi : राहूल गांधी जोडताहेत माणसांची हृदये !

Rahul Gandhi : राहूल गांधी जोडताहेत माणसांची हृदये !

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी (Rahul Gandhi )सद्या खुप चर्चेत आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. मात्र ते चर्चेत आहेत ते वेगळयाच कारणासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी (Rahul Gandhi) सद्या खुप चर्चेत आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. मात्र ते चर्चेत आहेत ते वेगळयाच कारणासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहेत. त्यांच्या या अभियानाचे अनेकांनी कौतुक केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियावर राहूल गांधीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो सद्या प्रचंड व्हायरल झाला असून, खूपच चर्चेत आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे. हातात हात घालून राहूल गांधी माणसांची हृदये जोडत आहेत. या फोटोमध्ये एका युवतीचा हात पकडून राहूल गांधी यात्रेमध्ये चालतांना दिसत आहेत.

यावेळी त्यांनी सफेद रंगाचा टीशर्ट घातला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. दोन दिवसांपूर्वी राहूल गांधी त्यांनी घातलेल्या शर्ट वरुन चर्चेत आले होते. त्यांनी 40 हजारांचा महागडा शर्ट घातला आहे, अशी चर्चा रंगली होती. राहूल गांधी यात्रे दरम्यान भेटीगाठी घेत आहेत. सोशल मीडियामधील अनेक फोटोमध्ये शाळेतील मुलांशी संवाद साधतांना देखील दिसत आहेत. यावेळी ते नागरीकांबरोबर जिव्हाळयाचे संबंध प्रस्थपीत करतांना दिसत आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष भक्कम करण्याचा वीडा उचलला आहे. त्यासाठी राहूल गांधीनी कन्याकुमारी से जम्मू काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. सोशल मीडियावर राहूल गांधीचा एका फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये त्यांनी 41 हजारांचा टी शर्ट घातल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ते 41 हजारांचा टी शर्ट घालून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.  भाजपधार्जीण्या लोकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला ‘अविश्वास’ !

LayBhari Exclusive : मुख्यमंत्र्यांची राजकीय सभा, गर्दी जमविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा लेखी आदेश !

Amit Shah slams Gandhi:‍ ‘राहूल गांधींची रस्त्यावर यात्रा, टी शर्ट मात्र 40 हजाराचा’

राजनिती तज्ञ प्रशांत किशोर यांनी देखील भार जोडो यात्रेवर आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत. ते म्हणतात की, ही यात्रा भाजपची सत्ता असलेल्या राज्यातून जाणे गरजेचे आहे. त्यामुळे बरेच बदल होऊ शकतात. काँग्रेस हा देशातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी प्रचार करण्याचा अध‍िकार आहे. ही यात्रा भाजपच्या विचारधारे विरोधात लढण्यासाठी काढण्यात आली, असल्याने त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल. काँग्रेसमध्ये चांगले रणनितीकार असल्याने  त्यांना यात्रेचा लाभ होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवतली आहे. बिहारमध्ये देखील यावेळी बदल दिसतील. येणाऱ्या न‍िवडणूका या भाजप विरुद्ध महागठबंधन अशा असण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी