29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : 'एकनाथ शिंदेंचा सर्वोच्च न्यायालयात खटला, तरीही सरन्यायाधिशांसोबत बसतात हे...

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंचा सर्वोच्च न्यायालयात खटला, तरीही सरन्यायाधिशांसोबत बसतात हे चुकीचे’

मुख्यमंत्री एकनाथ‍ श‍िंदे(Eknath Shinde)यांची चर्चा राज्यात सर्वत्र सुरू असते. ती त्यांच्या बंडखोरीची आणि त्यानंतर त्यांनी घेतलेल्या धाडेबाज निर्णयांची.

मुख्यमंत्री एकनाथ‍ श‍िंदे (Eknath Shinde) यांची चर्चा राज्यात सर्वत्र सुरू असते. ती त्यांच्या बंडखोरीची आणि त्यानंतर त्यांनी घेतलेल्या धाडेबाज निर्णयांची. मात्र यावेळी ते एका वेगळया कारणासाठी चर्चेमध्ये आले आहे. ते एका कार्यक्रमात सरन्यायाधिशांसोबत बसलेले दिसले. त्यावर जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी tweet करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे वागणे किती चुकीचे आहे हे दाखवून दिले आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करुन वेगळा गट स्थापन केला. त्यावरुन श‍िवसेना कोणाची हा वाद प्रलंबीत आहे.

तसेच शिवसेनेचे न‍िवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे यावर देखील न्यायालयीन लढाई सुरू आहे. असे असतांना म्हणजेच सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू असतांना ते सरन्याधिशांसोबत एकाच व्यासपीठावर बसतात. ही गोष्ट लोकशाहीच्या संकेतांना धरुन नाही असे जयंत पाटील यांना सुचवायचे आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावर आता विरोधकांनी जोरधार टीका करण्यास सुरूवात केली आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर तुम्ही राज्यपालांना भेटणार आहात का? असा प्रश्न मीडियाने विचारला असता यासाठी टाईमपास करायला आमच्याकडे वेळ नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला ‘अविश्वास’ !

Rahul Gandhi : राहूल गांधी जोडताहेत माणसांची हृदये !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांवर विरोध सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते त्यांचे कौतुक करत आहेत. आता तर त्यांच्या पुत्रानेच त्यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळयात खुपत आहे. विरोधकांच्या स्वप्नातही एकनाथ शिंदेचे येत असतील.

तसेच विरोधकांना सगळीकडे फक्त एकनाथ शिंदेच दिसतात. राज्यात हे सरकार आल्यापासून विरोधकांकडे काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात. गणेशोत्सव काळात गणपती दर्शनावरुन देखील विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यांच्यावर रोजच टीका होत असते. त्यामुळे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना हा टोला लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी