28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयमुंबई बँकेची सत्ता प्रवीण दरेकरांच्या हातून निसटली

मुंबई बँकेची सत्ता प्रवीण दरेकरांच्या हातून निसटली

टीम लय भारी

मुंबई :- मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली आहेत.( Mumbai Bank escaped from the hands of Praveen Darek)

उपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई जिल्हा बँकेवर एक हाती सत्ता होती. यातच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ : धनंजय मुंडे

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra: AAP demands action against Opposition leader Pravin Darekar

आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून  मुंबई जिल्हा बँकेंवर असलेले प्रवीण दरेकरांचं वर्चस्व मोडून काढण्याचं ठरलं. आणि त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात यश मिळाले आलं आहे. तब्ब्ल एक वर्षानंतर  मुंबई बँकेचे अध्यक्षपद हे  शिवसेनेला मिळाले आहे.

सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची धुरा त्यांनी सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने आपले नाव कोरले असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या बाजूने गेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी