27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयमुंबई पोलिसांची महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी नियमावली

मुंबई पोलिसांची महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी नियमावली

शनिवारी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन महाविकास आघाडीला करावे लागणार आहे. या मोर्च्यासाठी महाविकास आघाडीचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी (ता. 17 डिसेंबर) मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध प्रश्नांना धरून महाविकास आघाडीकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मोर्चा कोणत्याही कायदा सुव्यवस्थेला गालबोट न लावता पार पडावा यासाठी आता मुंबई पोलीस (Mumbai Police) यांच्याकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीकडून या मोर्च्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. पण मोर्चा निघण्याच्या एक दिवस आधी मुंबई पोलिसांनी काही अटी घालत हा मोर्चा नेण्यास परवानगी दिलेली आहे.

भायखळा येथील रिचर्डसन्स अँड क्रुडास कंपनीपासून या महामोर्च्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या मोर्च्याची सांगता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीची जवळ होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे.

महाविकास आघाडीला हा मोर्चा काढताना मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. पोलिसांनी नियमावलीत सांगितल्याप्रमाणे, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे भाषण मोर्चाला मार्गदर्शन करताना नेत्यांना करता येणार नाही. मोर्च्यामध्ये जे कोणते नेते भाषण करतील त्या भाषणांमध्ये कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य त्यांना करता येणार नाही. मोर्च्यामध्ये तलवार, चाकू किंवा इतर कोणतेही शस्त्र वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मोर्चा सुरू असताना किंवा मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या दरम्यान कुठेही फटाके फोडता येणार नाही. तसेच महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलेल्या मार्गानुसारच हा मोर्चा मार्गस्थ होणे, बंधनकारक राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून सर्व नियमांचे पालन करण्यात यावे या अटींवरच सदर मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

अबब ! पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केली ४७ कोटीची बोगस कामे; शिवसेना नगरसेवकाचा गंभीर आरोप !

चित्रलेखाने घेतला निरोप; ज्ञानेश महारावांनी लिहिले, राम राम अमुचा घ्यावा!

अभिनेता मुकेश खन्नाची बेशरम रंग गाण्यावर संतापजनक प्रतिक्रिया

महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल या मोर्चाला साधारणतः दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये दोन अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह आठ ते 10 पोलीस उपायुक्त यांच्याद्वारे या बंदोबस्तात लक्ष देण्यात येणार आहे. सोबतच या मोर्चासाठी एसआरपीएफ च्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्च्यावर पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी