30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयमविआचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजीचे टोपले घेऊन आंदोलन

मविआचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजीचे टोपले घेऊन आंदोलन

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवरच महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज पुन्हा विधानसभा पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.

या आंदोलनात मविआचे अनेक आमदार सहभागी झाले होते. यावेळी अनेक घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होमार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत.

हे सुद्धा वाचा :

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

विधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार आईला रडू कोसळले…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी