29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयपंडित नेहरूंचे योगदान नवीन पिढीला समजावे यासाठी राज्यभर कार्यक्रम राबवणार - नाना...

पंडित नेहरूंचे योगदान नवीन पिढीला समजावे यासाठी राज्यभर कार्यक्रम राबवणार – नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई :  पंडित नेहरू यांचे योगदान नव्या पिढीला समजावे यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभर कार्यक्रम राबवणार. असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे (Nana Patole: Congress will try to make  new generation understand contribution of Nehru).

तसेच या प्रकारचे कार्यक्रम राबविले तर पंडित नेहरू यांच्या प्रती जो अपप्रचार सुरू आहे तो खोटा असून लोकांना वस्तुस्थिती समजेल. असे पटोले म्हणाले. पंडित नेहरू यांचे योगदान नव्या पिढीला समजावे यासाठी प्रा. अगरवाल यांचे कल आज और कल हे व्याख्यान टिळक नगर येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

परमबीर सिंग फरार होण्यात केंद्राचा हात : नाना पटोले

पंचायत समितीत काँग्रेसची मुसंडी! नाना पटोले म्हणाले…

Nana Patole: try to undresand contribution of Nehru
प्रा. पुरुषोत्तम अगरवाल

प्रा. अगरवाल आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, नेहरुंवर आज बोलण्याचे कारण हेच आहे की भारतीय संस्कृती व सभ्यता धोक्यात आली आहे.‘आयडिया ऑफ इंडिया’ सोडून ‘दुसरी आयडिया ऑफ इंडिया’ थोपवली जात आहे, त्याला विरोध नाही पण ते देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. ‘भारत माता की जय’चा नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया व आत्मचरित्रात उल्लेख केला आहे…परंतु आज ‘भारत मात की जय’ला धमकीच्या रुपात पाहिले जात आहे.

महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्याबद्दल भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात चर्चा केली जाते, त्यावर बोलले जाते पण पंडित नेहरु यांच्याबद्दल त्यापद्धतीने बोलले जात नाही. त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. या देशाला सर्वात मोठा धोका हा सांप्रदायिकतेचा आहे हे पंडित नेहरुंनी जाणले होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मध्यममार्ग निवडला, भारतीय जिवनाचा सार सम्यक वा मध्यम मार्ग आहे.

मोदी सरकार जनतेला चिटकलेला ‘जळू’ : नाना पटोले

Mumbai’s weekly tally dips, Maharashtra’s Covid-19 case count at 17-month low

विविधतेत एकता ही फक्त घोषणा नाही तर आपली जीवनशैली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात वैचारिक मतभेद होते पण ते खुर्चीसाठी नव्हते. बड्या नेत्यांचे मतभेद हे खुज्या लोकांना समजणार नाहीत.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनीक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ माजी मंत्री सुरेश शेट्टी, उल्हासदादा पवार, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे आदी होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी