32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयप्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात भाजपाल आहे, नाना पटोले

प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात भाजपाल आहे, नाना पटोले

टीम लय भारी

 मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी राज्यपालांविरोधात आक्रमक झालेलेपाहायलामिळाले(NanaPatole,Maharashtra has a BJP Every state has a governor)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील आमदारांनी राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यात सोडलं आणि निघुन गेले. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे.

गुरूवारी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांना पुरतं घेरल्याचं दिसलं. तर नाना पटोले यांनी आज ट्विट करत राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात मात्र ‘भाजपाल’ आहे, असं खोचक ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारं नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी गुरूवारी केला होता.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात ,शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचे भाजपकडून भासवले जाते

“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

‘Won’t Be Possible Without Congress’: Nana Patole Reacts To KCR’s Meetings With Sena, NCP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी