27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीय१४ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात; नवी मुंबई मेट्रो अखेर धावणार

१४ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात; नवी मुंबई मेट्रो अखेर धावणार

राज्यात गेली १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला मेट्रोचा प्रश्न कधी सुटणार याकडे अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांची प्रतीक्षा होती. उद्घाटनाच्या वादात मेट्रो कधी धावणार हा महत्त्वाचा प्रश्न नवी मुंबईकरांना होता. काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू होते. मात्र या काही वर्षात ते काम संपुष्टात आले मात्र मेट्रो (Navi mumbai Metro) सुरू कधी होणार याचे उत्तर सरकारकडे नव्हते. मात्र आता तारीख ठरली असून (१७ नोव्हेंबर) दिवशी मेट्रो धावणार आहे. नवी मुंबईकरांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. तळोजा ते बेलापूर दरम्यान पहिला प्रवासाचा टप्पा असणार आहे. मेट्रो कधी सुरू होणार यावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका केल्या. यावेळी सरकारने वेळ नसल्याची करणे देत मेट्रो प्रश्न प्रलंबित ठेवला. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेक दिवसांपासून नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन कोण करणार? हे उद्घाटन कधी होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (१७ नोव्हेंबर) दिवशी मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तळोजा-पेंधरवरून सुटणारी मेट्रो आता बेलापूर स्थानकापर्यंत थांबणार आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रलंबित राहिलेला मुद्द्यावर तोडगा काढण्याचे काम सरकारने केलं. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे.

हे ही वाचा

जालना जिल्ह्यात ‘ओबीसी एल्गार महासभा’ ‘या’ नेत्याने पोस्टर शेअर करत दिली माहीती

‘मनोज जरांगेंच्या मागून कोणी तरी बोलतंय’?

‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मतदान करा’

काय म्हणाले मुख्यमंत्री

नवी मुंबईकरांना पेंधर ते बेलापूर दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल. ही सेवा (१७ नोव्हेंबर) दिवशी करण्यात येईल. नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार होणार आहे. जलद, पर्यावरणपूरक, आरामदायी आणि सक्षम पर्याय म्हणजे बेलापूर जवळील विकसित भागात खारघर, तळोजे येथे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत

मेट्रो तिकिट दर (Metro Tickets)

सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मेट्रो सुरू राहिल. दर १० मिनीटांनी मेट्रो आपल्या सेवेसाठी तत्पर असेल. मात्र यासाठी काही ठराविक दर आकारण्यात आले आहेत. ० ते २ किमीसाठी १० रुपये आकारले जाणार आहेत. २ ते ४ किमी टप्प्यात १५ रुपये आकारले जाणार आहेत. ४ ते ६ किमी टप्प्यात २० रुपये तिकिट असेल. ६ ते ८ किमी २५ रुपये तर ८ ते १० किमिसाठी ३० आणि त्यापुढील टप्प्यासाठी ४० रूपये मेट्रोचे तिकिट आकारले जाणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी