28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयनवाब मालिकांचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाईंड

नवाब मालिकांचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाईंड

टीम लय भारी

मुंबई:-उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होत, त्या प्रकरणाचे मास्टरमार्ईंड परमबीर सिंह हेच आहेत. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. (Nawab Malik allegation Parambir Singh Antilia mastermind)

सचिन वाझे हा परमबीर सिंह यांच्याच टोळीचा भाग आहे.  एकीकडे अनिल देशमुख यांनी देखील अनिल परब यांचं नाव घेतलेलं असताना आता या सगळ्या प्रकरणावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.यासंदअँटिलिया प्रकरणानंतर बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करुन अनिल देशमुख आणि महाविकासआघाडी सरकारला बदनाम केले, असे नवाब मलिक यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

हे सुद्धा वाचा

८० विरुद्ध २० च्या विधानावरून मुख्यमंत्री योगींवर नवाब मलिकांची टीका, म्हणाले…

भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला?, मंत्री नवाब मलिकांचा भाजपला सवाल

नवाब मलिक यांचा नेमका रोख कुणाकडे? ‘हा’ फोटो ट्वीट करून म्हणाले, “पहचान कौन?”

‘This cannot go on’: Bombay HC seeks Nawab Malik’s reply to contempt plea by Sameer Wankhede’s father

यावेळी नवाब मलिक यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांविरुद्धही ईडी याचप्रकारे कारवाई करत आहे. देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांकडून हेच उद्योग सुरु आहेत. महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी सरकार झुकत नाही हे पाहून भाजपकडून वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमधील कोणताही नेता दबावाला बळी पडणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले

“परमबीर सिंग यांची सगळी वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे. हा सर्व विषय अँटिलिया बॉम्ब प्लांट प्रकरणापासून सुरू झाला. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएसच्या तपासात अजून काही सत्य समोर येणार होतं. पण एनआयएनं हा तपास हाती घेतल्यानंतर परमबीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा देखील उल्लेख आहे. इमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले त्याचाही उल्लेख आहे. एनआयएने सांगितलं होतं की आम्ही या प्रकरणात अतिरिक्त चार्जशीट फाईल करणार. पण ते होत नाहीये”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, हा सगळा परमबीर सिंग यांनाच वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. “परमबीर सिंग यांना एनआयएच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परमबीर सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप केले गेले. परमबीर सिंग हेच मास्टरमाईंड असून त्यांची वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या सरकारला बदनाम करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे कारस्थान रचलं आहे. कोर्टात हे सगळं उघडं पडेल”, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला.

ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ला संदर्भात मलिक म्हणाले, ओवैसी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात निवडणुका शांततेत झाल्या पाहिजेत याची जबाबदारी उत्तरप्रदेश पोलिसांवर स्टार प्रचारक यांच्या सुरक्षेबाबत निवडणूक आयोगाने पोलिसांना आदेश दिले पाहिजे.ओवेसी यांच्यावर हल्ला गंभीर असून याची दखल उत्तरप्रदेश पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. असे ही ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी