30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयरझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार का बसले होते, स्पष्टीकरण द्या : नवाब...

रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार का बसले होते, स्पष्टीकरण द्या : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई: रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी भाजप करत असताना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. ते का बसले होते? याचं उत्तर भाजपने द्यावं, असं नवाब मलिक म्हणाले (Nawab Malik questions BJP MLA Ashish Shelar).

नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत अमरावती हिंसाचार आणि रझा अकदामीवर भाष्य केलं. “रझा अकादमीचा जो गुन्हा असेल त्याचा पोलीस तपास करतील. त्यांना सोडलं जाणार नाही. पण रझा अकामदीच्या कार्यालयात ॲड. आशिष शेलार बसले होते,” असं नवाब मलिक म्हणाले.

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडतं; शिवसेनेचा टोला

नवाब मलिक यांना त्या फोटो मागचा अर्थ विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मला काही माहिती नाही. माझ्या कार्यालयात कोणी आलं तर मला आक्षेप नाही. नेते असतील, मंत्री असतील त्यांच्या कार्यालयात लोकं येतात. त्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ येत असतं. पण भाजपचे नेते रझा अकदामीच्या सोबत त्यांच्या कार्यालयात कुठली मिटींग करत आहेत याचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तो फोटो कधीचा आहे माहित नाही. त्याचा पोलीस तपास करतील,” असं नवाब मलिक म्हणाले.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण; नाना पटोलेंचा निशाणा

NCB moves court to seek voice samples of Nawab Malik’s son-in-law, others in drugs case

भाजपच्या अनिल बोंडेंनी दंगलीचं षडयंत्र रचलं

नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा गंभीर आणि खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी