27 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीय'मातोश्री घर आवडणारच कारण शासकीय घरात राहून कर्तुत्व दाखवावं लागतं', निलेश राणेंचा...

‘मातोश्री घर आवडणारच कारण शासकीय घरात राहून कर्तुत्व दाखवावं लागतं’, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

टीम लय भारी

कणकवली : राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत चांगलीच वादळी ठरत आहे. राजकारणातील आरोप – प्रत्यारोप, महाविकास आघाडीचे अपयश, मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द, शिवसेनेतील बंड, एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वास, शिवसेनेचे भविष्य अशा सगळ्याच बाबतीत ठाकरे यांनी तठस्थपणे आपले म्हणणे मांडले आहे. त्यांच्या मुलाखतीला कोणी चांगला प्रतिसाद दिला तर कोणी यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत “मातोश्री घर आवडणारच कारण शासकीय घरात राहून कर्तुत्व दाखवावं लागतं” असे म्हणून त्यांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. निलेश राणे ट्विटमध्ये लिहितात, “स्क्रिप्टेड मुलाखतीत अडीच वर्ष शासकीय निवासस्थान वर्षा येथे मुख्यमंत्री म्हणून वावर असताना उद्धव ठाकरेंना काय आठवतं तर तिथे असलेलं गुलमोहराचं आणि बदामाचं झाड. वर्षा आणि मातोश्री मध्ये तुम्हाला मातोश्री घर आवडणारच कारण शासकीय घरात राहून कर्तुत्व दाखवावं लागतं असं म्हणून टीकास्त्र सोडले आहे.”

राणे पुढे लिहितात, “उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात, असे म्हणून शिवसेनेच्या या दुटप्पी वागणुकीवर निलेश राणे यांनी बोट ठेवून शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा…

साहेब पोहायला गेले आणि….

पुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग? दुसऱ्यांदा बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

प्रियकराने पळवून नेलेल्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!