32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींवर पलटवार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींवर पलटवार

टीम लय भारी

नवी दिल्ली:- केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुसतंच ट्विटरवर भाष्य करून काहीही होत नाही, इतरांवर टिका करण्यापेक्षा स्वत: काहीतरी आधी काहीतरी केले पाहिजे, असे राहुल गांधींना म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात येत्या पुढील वर्षातील विकास रचना मांडली.( Nirmala Sitharaman retaliates against Rahul Gandhi)

अर्थसंकल्प 2022-23 मध्ये ३९.४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शिवाय भारत अधिक प्रभावशाली व आधुनिक कसा बनेल यांवर भर देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्र्यांची महाविकास आघाडीवर खोचक टीका

अर्थमंत्र्यांची घोषणा, वर्षभरात देशात 5G सेवा सुरू करणार

पुढील तीन वर्षांत भारतात “400 वंदे भारत ट्रेन” येणार

After Nirmala Sitharaman’s “Typical UP-Type” Dig, Priyanka Gandhi Reacts

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प अगदी शून्य आहे. यातून सामान्य माणसाला कोणताच फायदा होणार नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पेवर बऱ्याच विरोधात पक्ष नेत्यांनी टिका आपापल्या अधिकृत अकाउंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया मांडली. त्यातील राहुल गांधींच्या ट्विटरच्या प्रतिक्रियेवर अर्थमंत्र्यांनी आपलं मत मांडलं आहे. राहुल गांधींची अक्षरश: खिल्ली उडवत अर्थमंत्र्यांनी ट्विटरवर भाष्य करून काहीही होत नाही, त्यांनी आधी काहीतरी केले पाहिजे, असे म्हटले आहे.

मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं की स्वत: काही करायचं नाही पण दुसऱ्यांवर आधी बोट दाखवायचं. तुम्हाला ट्विटरवर काहीतरी टिका करायची आहे म्हणून ते बोलयाचं . अशातला भाग आहे हा. त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी