33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयसंजय राऊत नावाचा साप शिवसेना सोडणार; 'या' पक्षात करणार प्रवेश; नितेश राणेंचा...

संजय राऊत नावाचा साप शिवसेना सोडणार; ‘या’ पक्षात करणार प्रवेश; नितेश राणेंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिवसेना सोडणार असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे. 10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापणदिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणी झाली आहे. मला ही माहिती सूत्रांनी दिली. संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिका पाहा. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत सातत्याने अजितदादांवर टीका करत आले आहेत. अजितदादांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो, अशी अटच त्यांनी घातली आहे. त्यामुळे ते सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. टीका करत आहेत. ते फक्त राऊत करत आहेत. उद्धव ठाकरे यांचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे, असा दावाही नितेश यांनी केला आहे.

शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला. तेव्हा राऊत यांना पवारांच्या व्यासपीठावर बसायचं होतं. त्यामुळे राऊत सकाळपासून पवारांच्या संपर्कात होते. पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे राऊत दुपारी 4 वाजता राऊत सिल्व्हर ओकला गेले, असं सांगतानाच राऊत साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत होता. तो बाळासाहेबांचा झाला नाही. तो तुमचा होऊ शकणार नाही. हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय, असंही ते म्हणाले. राऊतांनी ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली. आता राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंना चित्र स्पष्ट होईल. एका माणसामुळे पक्ष फुटला हे त्यांना कळेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान आता भाजप आमदार नितेश यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली असून नितेश राणे यांचा दावा खरा ठरल्यास हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

हे सुद्धा वाचा : 

गेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही; संजय राऊतांची मोदींवर सडकून टीका

राजीनाम्याचा विषय संपला, आता कामाला लागा: शरद पवार

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

Nitesh Rane on Sanjay Raut, Sanjay Raut will leave Shiv Sena to join NCP, Nitesh Rane, Sanjay Raut, Shiv Sena, NCP, Nitesh Rane claim on Sanjay Raut will leave Shiv Sena to join NCP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी