25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीय...तर ओबीसी रस्त्यावर उतरतील; ओबीसी नेते शेंडगे यांचा इशारा

…तर ओबीसी रस्त्यावर उतरतील; ओबीसी नेते शेंडगे यांचा इशारा

राज्यात सध्या एकाच विषयाची चर्चा होत आहे, ती म्हणजे आरक्षण. मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, धनगर समाजाचीही आरक्षणाची मागणी आहे. शिवाय लिंगायतसह इतर काही ज्ञाती बांधव आरक्षणासाठी आक्रमक आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आक्रमक झाल्यामुळे आता ओबीसी समाजही आक्रमक बनला आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही, पण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी ओबीसी संघटनांची भूमिका आहे. तरीही जरांगे-पाटील यांच्या महाविराट सभेनंतर त्यावर चर्चा करण्यासाठी ओबीसी संघटनांचे नेते नागपुरात एकवटले असून लवकरच ते त्यांची भूमिका जाहीर करतील. या शिवाय ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी १४ ऑक्टोबरच्या अंतरवाली सराटी गावातील महाविराट सभेत मोठी घोषणा केली होती. सरकारकडे आता १० दिवस निर्णय घेण्यासाठी शिल्लक आहेत. तोपर्यंत आम्हाला ओबीसींमधून आरक्षण द्या आणि सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. एकीकडे सरकार म्हणत आहे की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, शिवाय मराठ्यांना आरक्षण देणार. पण सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसे, याबाबत स्पष्ट काहीही सांगत नाही. त्यामुळे आरक्षण देण्याबाबत गोंधळ वाढला आहे, एवढे नक्की. त्यामुळे आपले आरक्षण कमी करायचे नाही, यासाठी ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. एवढेच नाही तर येत्या १० नोव्हेंबरला ओबीसींची हिंगोलीत सभा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवारच्या सभेत मराठ्यांना कायम टिकणारे आणि ५० टक्क्यांच्या मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली होती. सरकारनेही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जरांगे-पाटील यांच्याकडून ४० दिवसांची मुदत घेतली आहे. आता सरकार हे कसे करून दाखवणार, याकडे ओबीसी नेत्यांचे लक्ष लागले आहे. तरीही ओबीसींच्या भावना काय आहेत, पुढे कोणती कृती करावी, यावर विचारविनिमय करण्यासाठी ओबीसी नेत्यांची नागपूरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, भंडारा आदींसह राज्याभरातील ओबीसी  नेते उपस्थित आहेत.

हे ही वाचा

येरवडा भूखंडाचे प्रकरण अजित पवारांना शेकणार? मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

गर्व से कहो हम हिंदू हैं, म्हणणारी शिवसेना आता.. डॉ. आशिष शेलारांचे ट्वीट

‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,’ प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका

 

क्रिमीलेयरची मर्यादा दर तीन वर्षांनी वाढवायची असते. पण आठ वर्षांत यात वाढ केलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय ओबीसी समाजाच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह नाहीत. ओबीसींच्या घरकुलाचाही मुद्दा आहे. यासर्व गंभीर विषयांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी