27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी साधला संवाद; राजकारणाचा खेळ चालत राहील, पण जनतेचे प्रश्न...

मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी साधला संवाद; राजकारणाचा खेळ चालत राहील, पण जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश

टीम लय भारी

मुंबई : जनतेच्या संबंधित महत्वाची कामे थांबवू नका. ती तातडीने करा. राजकारणातले डावपेच चालतच राहतात. जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे. लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दया, असे आदेश आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित विभागांना दिले.

राजकारण आणि पावसाचे काही खरे नसते. ते नेहमीच अनिश्चित असतात. राजकारणातले डावपेज चालतच राहतील. मात्र राज्य कारभार थांबता कामा नये. आज सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत कामांचा आढावा घेतांना मुख्यमंत्री म्हणाले,कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, आषाढी वारीतील सुविधा याविषयी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. एकूण विधासभेच्या निवडणुकीच्या या रणसंग्रामात निर्माण झालेल्या या गोंधळातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेचा विचार करतात हेच यावरुन स्पष्ट झाले.

हे देखील वाचाः बंडोबा सापडणार का, कायद्याच्या कचाट्यात ?

शिंदे – भाजपाकडे राज्यपाल, तर महाविकास आघाडीकडे विधानसभाध्यक्ष !

आसामची इज्जत जात आहे, इथून लवकर चालते व्हा; एकनाथ शिंदेंना स्थानिकांचे पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी