30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीय“आमच्या बहिणींना भयमुक्त ठेवा आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवा”: पंतप्रधान मोदी

“आमच्या बहिणींना भयमुक्त ठेवा आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवा”: पंतप्रधान मोदी

टीम लय भारी

उत्तर प्रदेश:- उत्तर प्रदेशला दंगलमुक्त ठेवण्यासाठी, महिलांना भयमुक्त ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. सहारनपूरमध्ये आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार आवश्यक आहे(P M Modi “Keep our sisters free from fear and send criminals to jail”)

जेणेकरून गरीबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळावेत. 

पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते आणि हे कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 2022 च्या यूपी निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा हा लोकांच्या हिताचा ठराव आहे, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हिजाबवरुन आंदोलन न करण्याचे गृहमंत्र्याचे आवाहन

‘ईडी’ला घाबरतात ते भित्रेच असतात, मुनगंटीवारांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात, काँग्रेस नसती तर आणीबाणी नसती

“Were Called ‘Gujarat Ke Gadhe'”: PM Predicts Doom Again For UP Rivals

“पश्चिम उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मला आनंद आहे की अशा हिवाळ्याच्या सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत. या सर्व मतदारांचे मी कौतुक करतो. भाजप यूपीचा ‘घोषणा पत्र’ हा लोककल्याणाचा ठराव आहे,” असे पंतप्रधान सहारनपूरमध्ये म्हणाले.  “आमच्या बहिणींना भयमुक्त ठेवा आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवा” असे आवाहन पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश दंगलमुक्त ठेवण्यासाठी  लोकांना केले

पीएम किसान योजनेंतर्गत दिलेले पैसे लहान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जात राहावेत यासाठी भाजप सरकारचीही गरज आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी प्रतिस्पर्ध्यांची खिल्ली उडवली आणि योगीजींनी गुन्हेगार आणि माफियांना तुरुंगात पाठवण्याऐवजी “महालात”  पाठवावे का, असा सवाल केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी