26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयमहायुतीचे खासदारकीचे उमेदवार; पाठीत खंजीर खुपसणार

महायुतीचे खासदारकीचे उमेदवार; पाठीत खंजीर खुपसणार

मुंबई,(प्रशांत चुयेकर)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांमध्ये आता लोकसभेपूर्वी कुजबूज सुरू आहे. आपण ज्या खासदारांना निवडून देणार आहोत ते विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात तर येणार नाही ना याची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
अबकी बार 400 असं टार्गेट घेऊन भाजपने महाराष्ट्रातील आमदारांची फोडाफोड करत सरकार स्थापन केले.सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत नको म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष यांच्यासह 47 च्या वर आमदारांची मोट बांधत बंड केले. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना ’50 खोके एकदम ओके’ अशी टीका करणाऱ्या अजित पवार यांनी सुद्धा 41 आमदार घेत सत्ताधारी गटात सहभागी होणे पसंत केले.

बारामतीच्या मेळाव्याबाबत काय म्हणाले संजय राऊतलोकसभेसाठी महायुतीची ही खिचडी झाली तरी विधानसभा निवडणूकीत मात्र सध्या प्रचार करणाऱ्या खासदारकीची उमेदवारच विरोध करतील अशी अवस्था राष्ट्रवादीतील आमदारांची झाली आहे.
लोकसभेला राष्ट्रवादी शिवसेना भाजपचे आमदार एकत्र आहेत. गतवेळच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होती. विधानसभेच्या निवडणुकीत हीच अवस्था झाली तर मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांची गोची आहे. लोकसभेसाठी त्यांच्या पाठीमागे फिरणाऱ्या अजित पवार गटाची अवस्था नंतर बिकट होणार आहे. त्यामुळे ईडीची चौकशी नको म्हणून गेलो असले तरी विधानसभा आपली पक्की असेल का अशी शंका अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. ज्यांना आपण आता निवडून देणार तेच पाठीत खंजीर खुपसणार काय असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

सई ताम्हणकर आता इथे झळकणार

उदाहरणात गतवेळच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना भाजप युती झाली होती. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे अपक्ष उभारले होते.यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय बाबा घाटगे होते . ह्या वेळच्या निवडणुकीत ते पुन्हा वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या विरोधात लढणार आहेत. महायुतीचे खासदारकिचे उमेदवार महायुती म्हणून समरजीत घाटगे यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. या निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी हसन मुश्रीफ मदत करणार आहेत. असे चित्र सर्वत्र असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी