24 C
Mumbai
Thursday, February 15, 2024
HomeराजकीयPCMC: पुणे निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतोय वाचा...

PCMC: पुणे निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतोय वाचा…

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना पोटनिवडणुकीचा निकाल येत असल्याने सत्ताधारी-विरोधकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार कसब्यात रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता येणार. मात्र हे किती खरे ठरते हे उदया अंतिम निकालाच्यावेळीच कळेल.

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. कसबापेठ विधानसभा मतदार संघात 50.06  टक्के मतदान झाले. तर पिंपरी चिंचवडसाठी 50.47 टक्के मतदान झाले होते. कसबा पेठांमध्ये काही भागांत कमी मतदान झाले. मात्र त्याचा फटका कोणाला बसणार याचा निर्णय उदया लागणार आहे. गुरुवारी (ता. 2 मार्च) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी निकालाचे चित्र दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना पोटनिवडणुकीचा निकाल येत असल्याने सत्ताधारी-विरोधकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान या मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. त्यातच आता एक्झिट पोल आला आहे. (PCMC: Pune Election Exit Poll)

पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान स्ट्रेलिमा संस्थेने एक्झिट पोल वर्तवला आहे.

द स्ट्रेलेमा (The strelema) संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार, चिंचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना 1 लाख 5 हजाराहून अधिक मते मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना 93 हजार आणि राहुल कलाटे यांना 60 हजाराहून अधिक मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठमध्ये रवींद्र धंगेकर विजयी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून धंगेकर यांना 74 हजारांहून अधिक मते मिळू शकतात. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना 59 हजारहून अधिक मते मिळण्याचा अंदाज या संस्थेकडून वर्तवण्यात येत आहे.

मतमोजणीमुळे थेरगाव परिसरातील वाहतुकीत बदल
थेरगाव येथील कामगार भवन कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीमुळे वाहतुकीत खंड पडून ती विस्कळीत होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली. थेरगाव येथील कामगार भवन कार्यालयात मतमोजणी होणार असल्याने तापकीर चौक ते ग प्रभाग महापालिका शाळा, थेरगाव येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून तापकीर चौकातून थेरगावकडे येणारी वाहनांना काळेवाडी फाटा किंवा एम. एम. स्कूल या मार्गाने वळविण्यात आली आहे. ग प्रभाग महापालिका शाळा, थेरगावकडे येणारी वाहतूक ही बारणे कॉर्नरवरून डांगे चौकमार्गे किंवा बिर्ला हॉस्पिटलमार्गे वळविण्यात आली आहे. ही गुरुवारपुरती तात्पुरती पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : 

‘महाशक्ति’ने पुण्याचा केला बिहार; धंगेकरांना विजयापासून रोखण्यासाठी पोलिस-सरकारी यंत्रणेचा गैरवापर; मीडियाची अळीमिळी-गुपचिळी!

निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड जगतापांचेच राहणार; पत्रकारांना पाकिटे!

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत राडा, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी