31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीययेत्या 24 मार्चला पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा

येत्या 24 मार्चला पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 24 मार्च रोजी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी आणि 2,000 कोटी रुपयांच्या इतर अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे जाणार आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

या धर्तीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 17 आणि 18 मार्च रोजी वाराणसीत तळ ठोकून विविध विकासकामांचा आढावा घेतील आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे, जिथे ते अनेक प्रकल्प जनतेला समर्पित करतील आणि 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या काही इतर प्रकल्पांची पायाभरणी करतील.

विशेषतः रोपवे बांधणे, आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आणि पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना यासारख्या प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. ते सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांचे आणि पोलिस स्टेशन्स आणि पोलिस लाईन्सच्या पायाभूत सुविधांच्या अपग्रेडेशन प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा :

क्रिप्टोकरन्सीला मोदी सरकारची मान्यता आहे का? जाणून घ्या नवा कायदा …

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी