31 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमुंबईमुंबईत राज्याच्या 'महिला सन्मान योजने'बाबत पहिल्याच दिवशी संभ्रम?

मुंबईत राज्याच्या ‘महिला सन्मान योजने’बाबत पहिल्याच दिवशी संभ्रम?

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या महाअर्थव्यवस्थेत एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. महिला सन्मान योजना (Mahila Samman Yojana) या नावाने महिलांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, या योजनेची अंमलबजावणी 17 मार्चपासून करण्यात आली. या योजनेला मुंबईतील एसटी आगारांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी मात्र या सवलतीच्या योजनेबाबत अनेक महिला अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले.

आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांच्या तिकीट दरात 50  टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर  ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारे आहे. विशेषतः राज्य परिवहन महामंडळाच्या साधी, मिडी- मिनी, निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकूलित) आदी विविध बसगाड्यांच्या तिकीट दरांमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

परळ आगारातून दररोज 60 हून अधिक एसटीच्या बस कोकण, पुणे, सातारा, अहमदनगर आदी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सोडण्यात येतात. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता परळ आगारातून महिला सन्मान योजना हा राज्य आहे. शासनाचा एक उत्तम उपक्रम. त्यामुळे महिला प्रवासी प्रवासासाठी पहिली पसंती एसटीला देतील, अशी माहिती  परळ एसटी आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण यांनी दिली.

कोकणात पहिली एसटी रवाना झाली आणि या बसगाडीतून प्रवास करणाऱ्या महिलेला सवलतीच्या दरातील पहिले तिकीट देण्यात आले. कुर्ला एसटी आगाराच्या आरक्षण यंत्रणेत नवीन दर अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे तिकीट आरक्षणात सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही, अशी खंत काही महिलांनी व्यक्त केली.

शासन निर्णय नुकताच जाहीर झाल्यामुळे संपूर्ण यंत्रणा अद्ययावत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत यंत्रणेत आवश्यक ते बदल होतील. मात्र, महिलांना सवलतीत तिकीट देऊन त्यांना या योजनेची माहिती देण्यात येत आहे, असे कुर्ला एसटी आगारातील वाहतूक नियंत्रण विभागातील सुदेश कोठे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा :

यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ विशेष तरतुदी

आता महिलांसाठी बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत; महाअर्थसंकल्पातील महिला विशेष योजना

मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी