30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयशरद पवार आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीनंतर; प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीनंतर; प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची काल काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांनी भेट घेतली. तुम्ही खरंच एकटे लढणार आहात का?, असा प्रश्न शरद पवारांनी या तीन नेत्यांना केला. त्यांच्या या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे (Praveen Darekar reaction to Sharad Pawar question).

एका वृत्तवाहिन्यावर बोलतांना प्रवीण दरेकरांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले तिथे नेमकी काय चर्चा झाली. हे माहीत नाही. नाना पटोले यांनी त्यांच्या मनातील आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना सांगितली. कितीही काही केलं काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तिन्ही पक्षात अंतर्गत काय चालू आहे, हे लोकांना कळून चुकलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एका बाजूला असून काँग्रेस एकटी पडलेली दिसत आहे. काँग्रेस फरफटत जात आहे की काय असे दिसत आहे, असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला आहे (Praveen Darekar has said that it seems that the Congress is moving around).

शरद पवारांचा कॉंग्रेसला सवाल, खरंच तुम्ही एकट्याने निवडणुका लढणार आहात का?

अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना दिला महत्त्वाचा सल्ला!

यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले, काँग्रेसमध्येही दुमत आहे, नाना पटोलेंची जाहीर भूमिका मांडू नये ही अपेक्षा आहे. तसेच इतर काँग्रेसच्या नेत्यांनीही चार भिंतीत बोलणे आवश्यक होते. नाना पटोलेंनी तीन पक्षाचा वाद चव्हाट्यावर आणला आहे. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आणले आहे. आता महाविकास आघाडीत विसंवाद असल्याचे पवारांच्या दरबारात जाऊन अधोरेखित करण्यात आले आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

Praveen Darekar reaction to Sharad Pawar question
प्रविण दरेकर

नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा बळी

Maharashtra panel report on NCP leader Eknath Khadse’s land deal missing?

शरद पवारांची काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांशी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांनी भेट घेतली आहे. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षांतील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरेच एकटे लढणार आहात का? तसे स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा प्रश्न पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या चर्चेबाबत काय म्हणाले माणिकराव ठाकरे

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार आहे. देशाचे काँग्रेसचे प्रभारी जेव्हा राज्यात येतात तेव्हा ते मित्र पक्षांच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेत असतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते त्यांना भेटले. या भेटीत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळी इतर विषयही निघाले असतील, ते स्वाभाविक आहे.

पटोले आणि पवार साहेबांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली आहे. असे सांगतानाच युती, आघाडी करायचा निर्णय पक्ष नेतृत्व घेत असते. त्यामुळे पवार असा प्रश्न विचारतील असे वाटत नाही. आघाडीचा निर्णय हा नेहमीच अंतिम टप्प्यावर होत असतो. 2014 मध्येही अंतिम टप्प्यावर निर्णय झाला होता. त्यावेळी आम्ही वेगळे लढलो होतो. त्याआधीही तसेच झाले होते. असे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी