33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय'पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला', काँग्रेस नेत्याचे खोचक वक्तव्य

‘पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला’, काँग्रेस नेत्याचे खोचक वक्तव्य

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली सीमारेषेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र मोदींच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून स्वागत केले जात आहे(Prime Minister lost the trust of the people of the country)

हे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा,बलिदानाचा तसेच वर्षभर केलेल्या संघर्षचा विजय आहे. पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी म्हंटले आहे.

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

Congress : मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार

शेतकऱयांच्या आंदोलनात काँग्रेस पक्ष पहिल्या दिवसापासून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तसेच या संघर्षात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून सहभाग घेतला होता. तसेच पहिल्या दिवसापासूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला हे तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागतीलच अशी भूमिका मांडली होती. आणि अखेर मोदी सरकारला मागे घ्यावेच लागले.

गांधी यांचे मोदींनी आधीच ऐकले असते तर ७०० शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता व आर्थिक नुकसानही झाले नसते. असे मत नसीम खान यांनी म्हंटले.

Prime Minister lost the trust of the people of the country
हे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा,बलिदानाचा तसेच वर्षभर केलेल्या संघर्षचा विजय आहे

Mumbai Congress : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग

Breaking News: Prime Minister Narendra Modi to have dinner with police officers

केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर ‘किसान विजय दिवस’ साजरा केला. मुंबईत टिळक भवन येथे फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, सचिव राजाराम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी, देशद्रोही, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून अपमानित करण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार केले गेले, दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या पण शेवटी शेतकरी एकजुटीपुढे केंद्र सरकारला झुकावे लागले.

शेतकऱ्यांचा केलेला अपमान जनता कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशाला खड्यात घालणारा निघाला. नोटबंदी, कोरोना व काळे कृषी कायदे हे घातक ठरतली हे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले होते पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवण्यात आली.

भाजपाचा हा अहंकार, मनमानीपणा हा देशातील जनतेच्या मुळावर उठला असून त्यात नुकसान जनतेचे होत आहे असे नसीम खान म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी