30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयप्रियंका गांधींच्या त्या व्हायरल व्हिडीओची होणार प्रशासनाकडून चौकशी

प्रियंका गांधींच्या त्या व्हायरल व्हिडीओची होणार प्रशासनाकडून चौकशी

टीम लय भारी

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी गेल्या असता तेथील स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रियंका गांधी यांना तेथील पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रियंका या झाडू मारताना दिसत आहेत (Priyanka Gandhi viral video will be investigate by administration).

मात्र आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, प्रियंका गांधी यांना झाडू मिळाला कसा?, गेस्ट हाऊसमध्ये धूळ आलीच कशी? या सर्व प्रश्नांबाबत चौकशी होणार आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे प्रशासनावर चांगलाच दबाव तयार झाला. याबाबत तेथील अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच याबाबत एक अहवालही तयार करण्यात आला आहे.

प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस जेल भरो आंदोलन करणार : नाना पटोले

‘स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक’

या अहवालात असे समजले की, प्रियंका गांधींच्या स्टाफ सदस्याने गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांकडून झाडू मागितला. झाडू मिळाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी स्वतः गेस्ट हाऊसमध्ये झाडू मारला. प्रियंका गांधींच्या स्टाफने हा व्हिडीओ शूट केला त्यानंतर लगेचच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, काय चाललंय देशात?’, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Not allowed to meet Priyanka Gandhi, says Robert Vadra

प्रियंका गांधींच्या त्या व्हायरल व्हिडीओची होणार प्रशासनाकडून चौकशी

गेस्ट हाऊसमध्ये धूळ आलीच कशी ?

मात्र प्रियंका गांधी राहात असेलेल्या गेस्ट हाऊसमध्ये साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हे गेस्ट हाऊस बुक असो या नको याची नेहमीच साफसफाई केली जाते. प्रियंका यांना गेस्ट हाऊसमध्ये व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलचं पालन करून ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार प्रियंका यांच्या येण्याआधी रुम साफ असणं गरजेचं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी