26 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी'

‘पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी’

देशात आयसीसी विश्वचषक (ICC Wordcup 2023) अनेक कारणांसाठी चर्चेत होता. टीम इंडिया यावेळी अंतिम सामना विजयी होईल आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरेल मात्र तसं झालं नाही. टिम इंडियाने चांगला खेळ दाखवला. विश्वचषकात दहा सामने विजयी झाले मात्र एका सामन्याने खेळाडूंचे स्वप्न अपूरे राहिले आहे. अशा स्थितीत अंतिम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi stadium) खेळला गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सामन्याला हजेरी लावली होती. याचसह अमित शाह उपस्थित होते. सुरूवातीला टिम इंडियाने १० षटकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. कर्णधार रोहित शर्माच्या बाद होण्यानंतर सामन्याचं चित्र अवघड होऊन बसलं. याच सामन्यात देशभरातून पनौती ट्रेंड सुरू होता. यावर राजकीय नेत्यांनीही पनौती (panauti) म्हणत मोदींना ट्रोल केलं आहे. (Rahul gandhi)

सोशल मीडियावर विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी पनौती ट्रेंड सुरू होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र त्यांच्या येण्याने सामन्यात पराजय पत्करावा लागला असल्याचे काही भारतीय क्रिकेट रसिक म्हणत आहेत. सोशल मीडियावर काही नेत्यांनी पनौती म्हणून मोदींना ट्रोल केलं आहे. मुंबई क्रिकेटची पंढरी असताना अहमदाबादला अंतिम सामना का खेळवण्यात आला, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. अशातच आता कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पनौती मोदी असा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा

कपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीला फायनलचं आमंत्रण नाही

ठाण्यात कंटेनरवर शिवसेना शाखा

‘तो आमचा गनिमी कावा असणार’; मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

काय म्हणाले राहुल गांधी

अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावर अनेकांनी पनौती म्हणून मोदींना ट्रोल केलं. अशातच आता राहुल गांधीनी पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी अशी मिश्कील टीका मोदींवर केली आहे. ते म्हणाले की भारत संघ चांगली कामगिरी करत होता. मात्र मोदी गेल्याने खेळाला पनौती लागली आणि संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी