28 C
Mumbai
Sunday, February 16, 2025
Homeराजकीयकपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीला फायनलचं आमंत्रण नाही

कपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीला फायनलचं आमंत्रण नाही

देशात आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC World cup 2023) नुकताच पार पडला. या विश्वचषकात टीम इंडियाने केलेल्या कामगिरीचे भारतात नाही तर जगात प्रशंसा केली जात आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात दहा सामन्यात सलग विजय मिळवला, मात्र अंतिम सामन्यात टीम इंडियाचं गणित चुकल्याने संघाला यंदाच्या वर्षीही विश्वचषकाच्या स्वप्नांपासून लांब राहावे लागले आहे. याच विश्वचषकात वेगवेगळे वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या विश्वचषकात १९८३ सालचा आंतरराष्ट्रीय विश्वचषक विजयी करून देणारे टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू कपिल देवला (Kapil Dev) अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केले नाही. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

भारतातील अनेक मान्यवर विश्वचषक पाहण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे काही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते देखील उपस्थित होते. मात्र सर्वप्रथम टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि कर्णधार कपिल देव यांनी १९८३ सालचा विश्वचषक जिंकून दिला होता. मात्र आता कपिल देव यांनाच बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केले नाही, असे कपिल देव म्हणाले आहेत. यावरून बीसीसीआयच्या आयोजनावर देशभरात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीस अंतिम सामन्यासाठी आमंत्रण न दिल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा

ठाण्यात कंटेनरवर शिवसेना शाखा

‘तो आमचा गनिमी कावा असणार’; मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

‘समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते; वाढवण्यासाठी नव्हे’; आव्हडांचा संताप

कपिल देव यांना आमंत्रण नाही

कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केलं नाही. कपिल देव यांनी देशासाठी सर्वप्रथम विश्वचषक जिंकून दिला. त्यांना ८३ सालच्या खेळाडूंना विश्वचषक पाहण्यासाठी आमंत्रित करायचे होते. मात्र मालाच आमंत्रण न केल्याचे कपिल देव म्हणाले आहेत. याबरोबर बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवारांना देखील आमंत्रित केले नसल्याचे सूत्रांद्वारे माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. मात्र यावर अजूनही शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शरद पवारांना देखील आमंत्रण नाही

कपिल देव यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रित न केल्याने कपिल देव म्हणाले की, मला हा सामना पाहायचा होता. माझ्यासोबत माझे सहकारी असावेत आणि सामना पाहावा. मात्र आमंत्रण नसल्याने मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की अंतिम सामना पाहण्यासाठी १९८३ ची संपूर्ण टीम असेल, मात्र आमंत्रण नसल्याने मी आलो नसून आयोजन मोठे असल्याने काही वेळा लोकं विसरून जात असतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी