27 C
Mumbai
Tuesday, February 13, 2024
Homeराजकीय‘तो आमचा गनिमी कावा असणार’; मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

‘तो आमचा गनिमी कावा असणार’; मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) रान उठलं आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) आंदोलन, मोर्चे आणि उपोषण करत आहेत. राज्यातील काही नेते त्यांना आरक्षण मिळणे कठीण असल्याचे सांगत आहेत. मात्र जरांगे त्यांच्या निर्णयावर आणि मराठा समाजासोबत ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ओबीसी (OBC) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याचे बोलत आहेत. राज्यात या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर जरांगेंनी (२० नोव्हेंबर) दिवशी कल्याण सभा घेत ज्यांनी आरक्षण घेतलं, त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.

मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचे ३० लाख पुरावे मिळाल्याची माहिती आम्हाला मीडियाकडून मिळाली आहे. अजूनही आम्हाला याबाबत अधिकृत माहिती मिळली नाही. ज्यांनी आमचे आरक्षण घेतलं आहे; त्यांची संपत्तीही जप्त केली पाहिजे, कल्याणच्या सभेत त्यांनी नाव न घेता आरोप केला आहे. २५ डिसेंबरला आम्ही काय करणार हे इतक्यात सांगणार नाही. तो आमचा गनिमी कावा असणार आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या सभेसाठी अनेक मराठा बांधव, नोकरदार, मराठे शेतकरी, सामान्य मराठे सभांना गर्दी करत आहेत. मराठ्यांनी ठरवलं आहे की, शांततेच्या मार्गाने संघर्ष, करून मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे. गनिमी कावा काय तर तो आम्ही आताच कसं सांगणार? असे जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

‘समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते; वाढवण्यासाठी नव्हे’; आव्हडांचा संताप

टीम इंडियाचा T-20 संघ निश्चित; सूर्यकुमार यादव कर्णधार तर…

‘राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी’; चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोवर फडणवीसांचे वक्तव्य

ओबीसी नेत्यांकडून जातीय तेढ

ओबीसी नेत्यांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्याच तयारीत आहेत. मात्र मराठा समाज तसे होऊ देणार नाही. मी आणि माझा मराठा समाज शब्द पाळतो. आम्ही आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने अबाधित ठेऊ. ज्यांनी आमचं आरक्षण खाल्लं त्यांची संपत्ती जप्त करा. ७० वर्षांचं वाटोळ करायला जबाबदार कोण? आरक्षण मिळू द्या सगळा बॅकलॉगही काढतो. असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

उग्र आंदोलन करू नका

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलाबाबत जरांगे म्हणाले की, कोणीही उग्र आंदोलन करू नका. मराठा समाजाने आत्महत्या केल्या तर आरक्षण घ्यायचं कोणासाठी आणि द्यायचं कोणाला? असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी