33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeराजकीयशिवाजी माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चर्चेत

शिवाजी माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चर्चेत

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या विरोधात कोण असा प्रश्न राज्याला पडला आहे. सध्याचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार का नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच एक नाव समोर येत आहे ते म्हणजे जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने होय. महाविकास आघाडीतील व महायुतीमधून सुद्धा शिवाजीराव माने यांच्या नावावर जोरात चर्चा सुरू असल्याचे कार्यकर्त्याच्यामधून बोलले जात आहे. तर तिसरा पर्याय म्हणून वंचित आघाडीतून सुद्धा त्यांचे नाव वरच्या स्थानी आहे.

महायुतीमध्ये शिवाजीराव माने यांची चर्चा

भाजपच्या वरिष्ठ श्रेणीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना वातावरण अनुकूल नाही अशी चर्चा सुरू आहे. केंद्रीय स्तरावर अनेक नावाचा शोध सुरू आहे.यामध्ये सुद्धा शिवाजीराव माने यांचेच नाव पुढे आहे. राजू शेट्टी यांच्यासारख्या
मोठ्या शेतकरी संघटनेच्या नेत्याला शिवाजीराव माने सारखा फाटका शेतकरी सुट होऊ शकतो. तो विजयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो अशीही माने यांच्या बद्दल बोलले जात.

महाविकास आघाडीला सुद्धा उमेदवाराचा शोध

भाजपने सर्वसामान्य जनतेने काँग्रेस पक्षाला दिलेल्या देणग्या लुटल्या

जाणून घ्या, कोरफडीमध्ये दडलेलं रहस्य

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

रंग खेळताना त्वचेला कसं जपाल; घ्या जाणून

महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येत आहे. या मतदारसंघात माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर,उल्हास पाटील,सत्यजित पाटील सरूडकर यांचा लोकसभा लढवण्यास विरोध आहे.त्यामुळे शिवसेनेला सुद्धा या ठिकाणी उमेदवार हवा आहे.त्यांच्याकडून सुद्धा शिवाजी माने यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.

महाविकास आघाडीचा राजू शेट्टींना विरोध

महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे मात्र महाविकास आघाडीच्या वतीने राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतूनच उभे राहावं त्यांना आमचा पाठिंबा असेल अन्यथा आमच्या पाठिंबा नसेल अशी अनेकांनी मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सुद्धा अशी मदत करता येणार नाही, असं कार्यकर्त्यांचे मत असल्याचं सांगितलं आहे.

कोण आहेत शिवाजी माने
जिल्हा नियोजन मंडळीचे माजी सदस्यव एकेकाळचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असलेले शिवाजी माने गतवेळच्या निवडणुकीपासून लोकसभेची तयारी केली आहे. शेतीविषयक प्रत्येक प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलेलं आहे. न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनेक साखर कारखान्यांच्या समोर आंदोलन केलेले आहे.शेतकऱ्याचा नेता म्हणून त्यांची जिल्हाभर इमेज तयार झालेली आहे. हाकेला साथ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी