राज्यामध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. यामुळे सध्या सर्वच राजकीय वातावर बदलून गेलं आहे. भाजपने सत्तेपोटी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडले आहेत. यावेळी अनेक नेत्यांच्या, आमदारांवर ईडीने चौकशी केली होती. म्हणून काही नेते हे भाजपशी युतीत आहेत. तर शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचा शिंदे गटाचा दावा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडताच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याची महिती दिली आहे. यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजूनही काही विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीने धाड टाकली आहे. अशातच आता शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांच्यावर २४ जानेवारी दिवशी ईडीने (ED) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
काही दिवसांआधी रोहित पवार यांच्या बारामती येथील बारामती अॅग्रो या कंपनीमध्ये ईडीने धाड टाकली होती. काही दिवसांपासून त्यांच्या कंपनीवर तपास करण्याचं काम सुरू असून मुंबईमधील काही ठिकाणी पाच ते सहा कार्यालयामध्ये देखील कसून तपासणी करण्यात आली. अशातच शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन साळवी यांच्यावर देखील एसीबी कसून चौैकशी करत आहे.
हे ही वाचा
‘मै अटल हू’, चित्रपटाची सर्वत्र चर्चा
‘या’ राज्यांमध्ये २२ जानेवारी दिवशी विद्यार्थ्यांना असणार सुट्टी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष नेत्यांवर ईडी आणि सीबीआयचा वापर करून नेते मंडळींना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही आता राजन साळवी हे थेट पोलिस कस्टडीमध्ये जाणार असल्याचं म्हणत आहेत. रोहित पवार यांनी प्रामाणिकपणे आपल्या कंपनीच्या चौकशीबाबत मान्यता दिली आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आता पुन्हा एकदा रोहित पवार हे आपल्यावर ईडीने केलेल्या आरोपाप्रकरणी २४ जानेवारी दिवशी चौकशीसाठी जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar has been summoned by the ED to appear before the agency on January 24 in connection with the Maharashtra State Cooperative (MSC) Bank scam.
(file pic) pic.twitter.com/Vpy9ddXp5d
— ANI (@ANI) January 19, 2024
रोहित पवार ईडीला सामोरं जाणार?
रोहित पवार हे सत्ताधारी पक्षांवर अनेकदा टीका करत असतात. तसेच रोहित पवारांचं पारडं हे जड जात असल्याच्या देखील चर्चा आहेत. काही दिवसांआधी रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा केली होती. यावेळी रोहित पवार यांनी खेडोपाडी जावून सामान्य तळागाळातील लोकांच्या आणि युवकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामुळे त्यांनी सरकारला प्रश्न उपस्थित केले. आता रोहित पवार यांच्यावर दबाव आणला जात असल्याचं अनेकदा रोहित पवार दावा करत आहेत. म्हणून आता रोहित पवार हे ईडीला सामोरं जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.