27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराम मंदिराचा मूर्तीकार उच्चशिक्षित असूनही जपतोय कलेचा वारसा

राम मंदिराचा मूर्तीकार उच्चशिक्षित असूनही जपतोय कलेचा वारसा

प्रभू श्रीरामाच्या मंदिराची (shree ram temple Aayodhya) झलक सोशल मीडियावरून अधून मधून पाहायला मिळते. २२ जानेवारी दिवशी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने आता अनेक भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पाहयला मिळत आहे. आयोध्येतील राम मंदिर बांधण्यासाठी अनेक वर्षांपासून भारतीयांनी आंदोलनं केली होती. यामध्ये अनेक तरूणांनी आपलं रक्त सांडलं होतं. मात्र २२ जानेवारी दिवशी असंख्य लोकांचे अपूरे राहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. सध्या राम मंदिराचा मुद्दा अनेक अंगानं गाजलेला आहे. मग तो निमंत्रणावरून असो की आणखी कुठला. अशातच आता रामाच्या मूर्तीबाबत एक माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधील मूर्तीकार अरूण योगिराज (Arun Yogiraj) यांनी बनवलेली रामाची मूर्ती प्राणप्रितेष्ठेसाठी निवडण्यात आली आहे.

कर्नाटकमधील मूर्तीकार अरूण योगिराज यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती बनवली आहे. सुरूवातीला तीन सुंदर मूर्त्या निवडण्यात आल्या होत्या. त्या तीन मूर्त्यांमधून एक प्रभू श्रीरामाची मूर्ती पसंत करण्यात आली आहे. तीच मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता मूर्तीकार अरूण योगिराज आणि त्याच्या कुटुंबातील लोकं खूपच आनंदी आहेत. अरूण योगिराजने यापूर्वीही अनेकांची मनं जिंकली आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी अरूणची भेट घेत त्याच्या पाठीवर थाप दिली आहे.

हे ही वाचा

राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चांना उधाण

सीमा हैदरने दिली गोड बातमी, ‘कुणी तरी येणार येणार गं…’

महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘जगावेगळे’ वाचनालय चालविणारा समाजसेवक

कोण आहेत अरूण योगिराज?

अरूण योगिराज हे उत्कृष्ठ मूर्तीकार आहेत. त्यांनी याआधी असंख्य मूर्त्या बनवल्या आहेत. अरूण हे त्यांच्या मूर्ती कला क्षेत्रातील पाचवे वारदार आहेत. याआधी त्यांच्या चारही पिढ्यांनी मूर्त्या बनवण्याचं काम केलं असून अरूण पाचवी पिढी आहे. अरूण आपल्या कलेसाठी केवळ कर्नाटक नाही तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या वारस गुणांमुळे अरूण यांनी ही कला जोपासली आहे आणि टिकवली आहे.

एमबीएतून शिक्षण आणि नोकरीवर पाणी

अरूण यांनी एमबीएमध्ये आपले शिक्षण केलं आहे. त्यांनी एक वर्ष एका खासगी कंपनीमध्ये काम केलं, मात्र त्यांना त्या ठिकाणी मन लागत नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मूर्ती घडवण्याकडे आपले लक्ष केंद्रित केलं आहे. त्याच्या मेहनतीला यश मिळालं आहे. आज देशातील ऐतिहासिक राम मंदिरामध्ये अरूण यांनी बनवलेल्या राम मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी