28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयवंदे मातरम, जय हिंद शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवे नियम

वंदे मातरम, जय हिंद शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवे नियम

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर दिवशी सुरू होणार आहे. हे अधिवेश लक्षात घेता पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभागृहात सदस्यांसाठी एक नवीन नियमावली लागू केली आहे. यामुळे सभागृहातील सदस्याला आत वंदे मातरम, जय हिंद असे उच्चार करता येणार नाहीत. याचबरोबर कोणताही राज्यसभा कारभारात खासदार ६० दिवसांहून अधिक सभागृहात उनुपस्थित राहीला तर त्याची जागा आता कायमस्वरूपी रिकामी होऊ शकते. राज्यसभेने याबाबत नियमावली आखली आहे. एकाच वेळेस दोन्ही सदस्यांना एकाच वेळी जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. या अधिवेशनासाठी राज्यसभा अधिवेशनासाठी काही नियमावली आखून दिली आहे. ही नियमावली खासदारांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इतरही काही नवीन आणि कडक नियम लागू करण्यात आले आहेत. याआधी राज्यसभेत अनेकदा काही खासदार गैरहजर राहत असायचे. मात्र ४ डिसेंबरला सुरू होणाऱ्या अधिवेशनात आखून दिलेल्या नियमांचे सदस्यांनी पालन करावं अशी नियमावली राज्यसभेने आखली आहे. त्याचबरोबर  राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजिनक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेत कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यासाठी बंदी आहे.

हे ही वाचा

वर्षाच्या अखेरीस सिमकार्ड वापराचे नवीन नियम जारी

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पटकावरणारा पैलवान लोकसभा निवडणूक लढणार?

दत्ता दळवींच्या अटकेनंतर गाडीची तोडफोड

राज्यसभेचे सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडून जाण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. राज्यसभेतील सदस्याला लिखीत भाषण बोलता येणार नाही. राज्यसभेत कार्यवाही सुरू असताना अनेक नेत्यांचे वक्तव्य, काही कृत्य, अनेकदा व्हिडिओच्या माध्यमातून टिपता येते मात्र आता व्हिडीओग्राफीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संसद परिसरात धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सदस्यांनी थेट अध्यक्षांशी संपर्क साधू नये.

नवीन सदस्यांचे पहिले भाषण हे २० मिनिटांपेक्षा अधिक असू नये.

अध्यक्षांच्या आसणाची मागील बाजू दाखवू नये.

सभापती बोलत असताना सभागृहात शांतता राखावी.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी