28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयजयंत पाटील युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत?

जयंत पाटील युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत?

राज्यात काही दिवसांपासून युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आहे. युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे काही दिवसांपासून संघर्ष यात्रेत तरूणांचे प्रश्न सोडवत आहेत. ही यात्रा आता वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. या यात्रेची सुरूवात ही (२४ ऑक्टोबर) दिवशी पुण्यातून झाली आहे. या यात्रेसाठी रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनीही या संघर्ष यात्रेत सहभाग घेतला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे, संदीप क्षीरसागर, अनिल देशमुखांनी सहभाग नोंदवला. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी अजूनही युवा संघर्ष यात्रेत सहभाग दाखवला नसल्याची चर्चा आहे.

शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. मात्र जयंत पाटील यांनी या संघर्ष यात्रेत सहभाग न दाखवल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या यात्रेसाठी राजेश टोपे, संदीप क्षीरसागर हे सहभागी झाले आहेत. ही संघर्ष यात्रा १२ डिसेंबरपर्यंत नागपूरला होणार आहे. यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिलं आहे.

हे ही वाचा

वंदे मातरम, जय हिंद शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवे नियम

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पटकावरणारा पैलवान लोकसभा निवडणूक लढणार?

वर्षाच्या अखेरीस सिमकार्ड वापराचे नवीन नियम जारी

आगामी निवडणुका पाहता भाजप ठिकठिकाणी जात असून प्रचार करत आहे. एवढंच नाही तर भाजप काही राज्यांमध्ये भाजपचे सरकार आणा सरकार आयोध्या वारीचा सर्व खर्च उचलेल, असे आश्वासन देत आहे. तर दुसरीकडे  भाजप प्रर्देशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील ठिकठिकाणी जात असून प्रचार करत आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी पायपीट करत आहे. अशातच आता रोहित पवारही युवा संघर्ष यात्रेसाठी मोलाचं काम करत आहेत.

सरकारने शेतकरी, युवा, महिलांचे प्रश्न, सरकारने गांभिर्याने घ्यावेत यासाठी संघर्ष युवा यात्रेचे आयोजन केलं आहे. मराठवाड्यातील सोनगाव तालुक्यात ही यात्रा दाखल झाली आहे. २४ ऑक्टोंबर दिवशी रोहित पवारांनी शरद पवारांच्या उपस्थितीत संघर्ष यात्रेस सरूवात केली. ८०० किमीचे अंतर पायदळ पूर्ण केले जाणार असून (२९ नोव्हेंबर) दिवशी हिंगोली जिल्ह्यात रिसोड तालुक्यात दाखल झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी