27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयदुष्काळावरून राजकीय कुरघोडीचा पाऊस

दुष्काळावरून राजकीय कुरघोडीचा पाऊस

राज्यात यंदा पावसामुळे दुष्काळी भागाची परिस्थीती अवघड होऊन बसली आहे. काही दिवसांपासून सरकारकडून राज्यातील दुष्काळी तालुक्यांचे नाव दुष्काळी भागात समाविष्ट केले नाहीत. यामुळे दुष्काळी भागाची परिस्थीती अवघड होऊन बसली आहे. मात्र यातील काही तालुके हे सुजलम सुफलम आहेत. तरीही त्यांचे नाव दुष्काळी भागात सामावून घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यात अनेक वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मात्र सरकारने या तालुक्याला दुष्काळी तालुक्याच्या यादीतून वगळले आहे. तर सातारा जिल्ह्यातील सुजलम सुफलम वाई तालुक्याला दुष्काळी तालुक्याच्या यादीत स्थान दिल्याची माहिती आता समोर आली आहे. हे इतरही तालुक्यांबाबतीत घडत आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी सरकार दुष्काळावर राजकारण करत असल्याचे वक्तव्य केले आहे.

वस्तुस्थितीकडं दुर्लक्ष करत केवळ तांत्रिक बाबींचाच आधार घेऊन राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केला. अहमदनगरसह अकोला, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. तर काही जिल्ह्यातील एखाद-दुसऱ्या तालुक्याचा समावेश केला आहे. दुष्काळाचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या जत तालुक्यातही दुष्काळ जाहीर न करणं, हे अनाकलनीय असून राज्य सरकारला शोभणारं नाही, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे.

हे ही  वाचा

शिवराय, आंबेडकरांबद्दल नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून ‘आउट’, ‘हा’ खेळाडू ‘इन’

भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ हादरले… भारतातही जाणवले हादरे!

राजकीयदृष्टीने विचार करायचा तर दुष्काळ जाहीर केलेले ४० पैकी ९५ टक्के तालुके हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. नगर जिल्ह्याचा विचार केला तर आजच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना आणि खुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांचा जिल्हा असतानाही एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. कदाचित भावी मुख्यमंत्री म्हणून महसूलमंत्र्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, त्यामुळं त्यांचा पत्ता परस्पर कट करण्याचा तर हा कट नसावा ना? असा सवाल आता रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

दुष्काळातही राजकारण

दुष्काळातही असं राजकारण केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. सरकारने कोणताही भेदभाव न करता वस्तूस्थिती तपासून तातडीने दुष्काळ जाहीर करुन शैक्षणिक शुल्कमाफीसह योग्य त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती! अन्यथा या दुष्काळातही राजकारण केल्यास लोकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यावी,असे ट्वीट करत रोहित पवारांनी सरकारचे कान टोचले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी