31 C
Mumbai
Sunday, May 28, 2023
घरक्राईमसलमान खाननंतर आता संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी

सलमान खाननंतर आता संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी

शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा संदेश आला असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून दिल्लीतील पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्याप्रमाणे हत्या करण्याचा उल्लेख करणारा धमकीचा संदेश आला आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा उल्लेख मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्सकडून तुला हा संदेश आहे. सलमान आणि तू फिक्स आहेस, तयारी करून ठेव. त्याचप्रमाणे अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज राऊत यांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान राऊत यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांचे तपास कार्य सुरू आहे.

सलमान खानलाही दिली होती धमकी

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला (Salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. रोहित गर्ग नावाच्या एका अज्ञात तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या ई-मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं म्हटलं होतं.

याप्रकरणी धाकडराम बिष्णोई नावाच्या एका 21 वर्षांच्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाने राजस्थान येथून अटक केली. तसेच त्याने सलमानप्रमाणे पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला यांच्या वडिलांनाही मेलद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा:

बॉलीवूडच्या भाईजानला जीवे मारण्याची धमकी; गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोईचा धमकीच्या ई-मेलमध्ये उल्लेख

बॉलीवूडचा भाईजानला जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण…; राऊतांचे चिमटे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी