29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनउत्साहाच्या भरात चाहत्यांनी फोडले थिएटरमध्ये फटाके

उत्साहाच्या भरात चाहत्यांनी फोडले थिएटरमध्ये फटाके

देशात दिवाळी सण असून सर्वीकडे आनंदाचे वातावरण आहे. या सणानिमित्ताने अनेकजन काही ना काही नियोजन करतात. तर काहीजण विरंगुळा म्हणून सिनेमा पाहायला जातात. चित्रपटाचा आनंद घेतात मात्र काही लोकांनी सिनेमा पाहत असताना थिएटरमध्ये सारे देह भान विसरून फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. (१२ नोव्हेंबर) दिवशी अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) टायगर 3 (Tiger3) हा सिनेमा जगभर रिलीज झाला आहे. सलमान खानचा सिनेमा म्हटल्यावर सलमान फॅन्स थिएटरमध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. मात्र यंदा चाहत्यांनी सिनेमाला गर्दी तर दाखवलीच मात्र यासोबत त्यांनी मालेगावच्या मोहनसिनेमा थिएटरमध्ये फटाके फोडले आहेत.

टायगर ३ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४४ कोटींएवढी कमाई केली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ हे मुख्य भूमिकेत आहेत. ही जोडी पाहण्यासाठी चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मात्र आशा स्थितीत काही अति उत्साही प्रेक्षकांनी भान न बाळगता थिएटरमध्ये फटाके फोडले आहेत. थिएटर स्क्रीनसमोर फटाके वाजवल्याने इतर काही प्रेक्षकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.

हे ही वाचा

चक्क १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, २० किलोमीटपर्यंत वाहतूक कोंडी

‘गौतमी पाटीलच्या डान्सने ठाणे झाले ओव्हरस्मार्ट’

रोहित पवार यांचं मोठं विधान, शिंदे गटाला धक्का बसणार

 

या घटनेनंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेची कसून चौकशी केली आहे. तर मोहनसिनेमा थिएटरमध्ये फटाके फोडले असल्याने थिएटर मालकावर कलम ११२ अंतर्गत गन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर मालेगावच नाही तर इतर भागातही लोकांनी असे कृत्य केले आहे. असे काही कृत्य करू नका असे ट्वीट करत सलमानने चाहत्यांना आवाहन केले आहे.

दरम्यान, या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफसोबतच इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहेत. तर शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी