30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांच्या राज्य सरकारला कानपिचक्या, प्रत्येक मुद्यावर मी बोलण्याचा ठेका घेतला नाही

संजय राऊतांच्या राज्य सरकारला कानपिचक्या, प्रत्येक मुद्यावर मी बोलण्याचा ठेका घेतला नाही

टीम लय भारी

मुंबई:- पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला.(Sanjay Raut state govt I have not agreedspeak on every issue)

यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया राज्य सरकारतर्फेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडायला हवी. मी माझ्या पुरतं माझं एक मत मांडलं. सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवं.

हे सुद्धा वाचा

गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, संजय राऊत

गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’वर संजय राऊतांचा आक्षेप, म्हणाले ‘आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका’

संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांची केली पाठराखण

“If They Lie, They’ll…”: Sena’s Sanjay Raut After Probe Agency Raids Aide

प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची. त्यांनी बोलावं ना! हा सरकारवर ठपका आहे. असेही राऊत म्हणाले

“पंतप्रधानांचे भाषण ऐकताना माझ्याकडून काही चूक झाली का म्हणून मी ते वाचले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या उल्लेखावर महाराष्ट्र सरकारनेच याचा खुलासा करायला हवा. मला हे ऐकून वाईट वाटलं. या करोनाच्या महामारीचा उगम चीनमधून झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे काम करते याचे दाखले हे सुप्रीम कोर्टाने इतर राज्यांना दिले. तसेच कोरोना नियंत्रणाबाबत जगभरात महाराष्ट्राचे कौतुक झाले आहे. धारावी पँटर्नचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले. कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. हा त्यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी म्हटले.  अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसने केले. काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाउनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी