29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या दादर येथील 'शिवतिर्थ' या निवास्थानी भेटीला गेले होते. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झाले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज ठाकरेंच्या दादर येथील ‘शिवतिर्थ’ या निवास्थानी भेटीला गेले होते. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी हजेरी लावली. सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी गेले. एकनाथ श‍िंदेचा गट बंडानंतर मनसेमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र न्यायालयीन लढाई सुरू झाल्या नंतर त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला. शिवसेनंतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समोर मोठा न्यायालयीन लढा उभा राहिला आहे.

मूळ शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पटत नाही हे सर्वांनाच माहित झाले आहे. राज ठाकरे नेहमीच आपल्या भाषणांमध्ये उद्धव ठारेंवर निशाणा साधतात. त्यामुळे त्यांच्या नात्यातील बिघडलेले संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत. आपल्या शत्रूचा शत्रूतो आपला मित्र या न्यायाने मनसे शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते. ते शिवसेनेचे मोठे नेते होते. त्याच वेळी एकनाथ शिंदे देखील शिवसेनेमध्ये होते.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केली ‘घोडचूक’, शरद पवार करणार सुधारणा !

NCP : हरियाणामधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष वीरेंद्र वर्मांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

NCP : ‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’ घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात धुळयात आंदोलन

त्यामुळे यांच्यामधील मित्रत्व कायम असू शकते. राज ठाकरे हे शिवसेनेशी बंड करुन बाहेर पडले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी मोठे बंड केले. त्यामुळे या बंडा बाबतची चर्चा या दोन नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. त्यामुळे या विषयावर या दोन नेत्यांमध्ये गुप्त चर्चा झाली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गणपतीच्या निम‍ित्ताने का होईना अखेर दोन माजी शिवसैनिक एकमेकांना आमने सामने भेटले.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या

मूळ ‍शिवसेना कोणाची हा लढ शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये सुरु आहे. बंडखोरी नंतर शिंदे गट मनसेमध्ये विलीन होऊ शकतो अशा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या विषयी मनसेने आपली भूमीका एकदाही स्पष्ट केली नव्हती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजपच्या काही नेत्यांची भेट झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरेंच्या ऑपरेशन नंतर त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीसांचे औक्षण केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी