29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : "तुतारी जनतेला प्रेरणा देईल", शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics : “तुतारी जनतेला प्रेरणा देईल”, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष-शरद पवार गटाला निवडणूक आयोगाला नुकतंच ‘तुतारी’ नव पक्षचिन्ह बहाल करण्यात आलं. त्यामुळे शरद पवार गटाकडून रायगडावक या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, “सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील.”

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला हे चिन्ह वापरता येणार आहे. त्यामुळे रायगडावरून या चिन्हा अनावरण करून शरद पवार गटाने मोठं शक्ती प्रदर्शन केलं. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, “तुतारी जनतेला प्रेरणा देईल”, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असेही आवाहन शरद पवारांनी रायगडावरून जनतेला केलं आहे. 

तुतारी हे राज्याचे ऐतिहासिक वाद्य आहे. त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळाले असल्याचा दावा सातत्याने शरद पवार गटाकडून केला जातोय. यानिमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आल्यानंतर वयोमानानुसार, शरद पवार आधी ते रोप वेने रायगडावर पोहोचले. त्यानंतर पवारांनी पालखीचा आधार घेतला. जवळपास 40 वर्षांनंतर ते किल्ले रायगडावर आज आले होते. 

आता शरद पवारांना छत्रपतींचा रायगड आठवला : राज ठाकरे

शरद पवार यांच्या गटाच्या नव्या चिन्हावरून विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यात राज ठाकरेंनीदेखील टीका केली आहे. ते म्हणाले की, “तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.”

हेही वाचा : Maharashtra Politics : तुतारी जनतेला प्रेरणा देईल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी