28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीयकोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? शरद पवारांनी उपटले बावनकुळे यांचे...

कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? शरद पवारांनी उपटले बावनकुळे यांचे कान

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील पत्रकारांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे बावनकुळे यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. असे असताना बावनकुळे पर्यायाने भाजपविरोधात रोष आहे. असे असताना आता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत?’ असा सवाल शरद पवारांनी विचारून उपटले बावनकुळे यांचे कान उपटले आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे चांगलेच कान उपटले. बारामतीत पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी या विधानाला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली.

‘आता काय त्या विधानाला महत्त्व द्यायचं एवढं. महाराष्ट्रातले पत्रकार या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत. महाराष्ट्रातले कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? महाराष्ट्राच्या पत्रकारांची अशी प्रतिमा नाही. असं वक्तव्य करणं म्हणजे समस्त पत्रकार वर्गाचा अवमान आहे. अशी भूमिका जे घेतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं? माझ्यामते  अशा गोष्टींकडे  दुर्लक्ष  करायला  हवं’, असं ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा

यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार?
बाबासाहेबांना छळणारे हिंदू, पारसी माफी मागतील का – जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
गांधीजींचे विचार शिल्लक नाहीत, गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून पत्रकार मंडळींवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. आपल्या मर्जीतील नसलेला, विरोधी विचारांच्या पत्रकारला हिणवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून चुकीचे वक्तव्य येत आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कळस केला होता. त्यांनी या प्रकरणी माफी मागावी यासाठी राज्यभरातील अनेक पत्रकार संघटनांनी आंदोलन केली होती.

बावनकुळे यांनी माफी तर मागितली नाही, शिवाय भाजपचे राज्याचे चाणक्य समजले जाणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे होता. पण तेही न झाल्याने राज्यातील अनेक पत्रकार भाजपवर नाराज आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी