28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयराजन साळवींच्या अडचणीत वाढ

राजन साळवींच्या अडचणीत वाढ

राज्यामध्ये आता आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी आता सत्ताधारी विरोधकांवर ईडी, सीबीआयचा वापर करत असून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्यावर एसीबीच्या पथकाने गेली आठ तासापासून त्यांच्या राहत्या घरी धाड मारली आहे. यामुळे आता त्यांच्या घराबाहेर आणि घरामध्ये तणावाचे वातावरण झालं आहे. या चौकशीमध्ये मी पोलिस कोठडीत जायला तयार असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलं आहे. काही दिवसांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामतीतील बारामती अॅग्रो येथे ईडीने धाड टाकली होती. काही दिवसांपासून तपासणी सुरू आहे. आणि आता राजन साळवींच्या घरी एसीबीच्या पथकाने धाड मारल्यानं त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ लागली आहे.

गेली आठ तासापासून राजन साळवी यांच्या राहत्या घरी तपासणी सुरू आहे. त्यानंतर त्यांना मध्यवर्ती जिल्हा बॅंकेमध्ये रवाना करण्यात आलं. यावेळी साळवी यांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. यावेळी साळवींच्या घराबाहेर अनेक कार्यकर्त्यांनी गराडा घातला. पोलिसांच्या गाडीमध्ये साळवी पाहताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या वैयक्तिक गाडीमधून बॅंकेकडे रवाना होण्यास सांगितलं. यावर पोलिसांनी साळवी यांना त्यांच्याच वैयक्तिक गाडीने बॅंकेकडं नेलं. यावेळी साळवींचे काही कागदपत्र बॅंकेमध्ये असल्याने चौकशीसाठी दाखल करण्यात आलं.

हे ही वाचा

राजू शेट्टी म्हणतात अनेक ऑफर आल्या तरीही मी हुरळून जाणारा नाही

राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी दिवशी ‘या’ कार्यालयांना असणार अर्धा दिवस सुट्टी

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पुणे ते आयोध्या ट्रेनची सुविधा

‘अटकपूर्व जामिन नको थेट पोलिस कोठडी’

याआधी एसीबीने साळवी यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल केले आहेत. याआधी त्यांच्यावर तब्बल सहा वेळा तक्रार नोंदवली आहे. मात्र काही झालं नाही. उत्पन्नापेक्षा ११८ नोंदी अधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे आता साळवी यांना अटक केली जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याउलट साळवी हे आता अटकपूर्व जामिन मागणार नसून पोलिस कोठडीत जाणार असल्याची महिती त्यांनी स्वत:च दिली आहे. अशातच सकाळपासून त्यांच्या घराची झडती सुरू असून कागदपत्रांची छाननी सुरू आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी