30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeजागतिकइम्रान खान यांच्यावर एकाचवेळी चार वेगवेगळ्या ठिकाणाहून केला गेला होता गोळीबार

इम्रान खान यांच्यावर एकाचवेळी चार वेगवेगळ्या ठिकाणाहून केला गेला होता गोळीबार

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर तीन ठिकाणांहून गोळीबार केला गेला होता. गोळीबाराचा तपास करणाऱ्या संयुक्त तपास पथकाने ही माहिती दिली आहे  या गोळीबारात अटक केलेल्या संशयित हल्लेखोरासह अन्य तिघे जण सहभागी होते.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गेल्यावर्षी 3 नोव्हेंबर रोजी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. लाहोरपासून 150 किलोमीटर दूर वजीराबाद परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागली होती. पाकिस्तानात मध्यावधी निवडणुकीच्या प्रचारासाठी इमरान खान यांनी रॅलीचे आय़ोजन केले गेल होते.

संयु्क्त तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रॅली दरम्यान कंटेनर ट्रकवर उभे असलेल्या इमरान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान एकूण 13 जणांना गोळ्या लागल्या. तपास पथकाने या रॅलीच्या नियोजनाच्या गैरव्यवस्थापनाबाबत देखील शंका उपस्थित केली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, माझ्यासमोर संभाजी महाराजांबद्दल दोन पद्धतींचे लिखाण

IND vs SL 1st T20 दिपक हुड्डा आणि अक्षर पटेलची दमदार खेळी

तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने दिली धडक; एक विद्यार्थिनी कोमात

पंजाबचे गृहमंत्री उमर सऱफराज चीमा म्हणाल होते, इमरान खान यांच्यावरील हल्ला हा नियोजीत कटाचा भाग होता. तर पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक अताउल्लाह तरार म्हणाले हल्याप्रकरणी पीएमएल-एनच्या दोन कार्यकर्तांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. त्याविरोधात आम्ही लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तरार म्हणाले, संयुक्त तपास पथकाने बेकायदा पीएमएल-एनच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली असून प्रमुख संशयित नावेद आणि त्याचा चुलत भाऊ मुहम्मद वकास संयुक्त तपास पथकाच्या ताब्यात आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी