30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयईडी, इनकम टॅक्सच्या बापालाही घाबरत नाही;राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे संतापले

ईडी, इनकम टॅक्सच्या बापालाही घाबरत नाही;राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे संतापले

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी भाजपावर गंभीर आरोप केलाय. भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात यावं म्हणून मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय (Shashikant Shinde serious allegation on bjp of offering 100 crore to join party).

तसेच त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असंही मत व्यक्त केलं. ते साताऱ्यातील कट्टापूरमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

आर्यन खानच्या काऊन्सिलिंगचे व्हिडीओ जाहीर करा;नवाव मलिकांचे थेट NCB ला आव्हान

पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

शशिकांत शिंदे म्हणाले, “भाजपाचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, ते आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला वाटतं तेव्हा १०० कोटी रुपये घेतले असते तर बरं झालं असतं. पण त्यांना माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही.”

प्रदेश काँग्रेसमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

NCP-Congress defectors want Amit Shah to save their sugar mills in Maharashtra

“ईडी, इनकम टॅक्सच्या बापालाही घाबरत नाही”
“भाजपाला, ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कुणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्या येथे आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा एकदा तोतरेपणा बाहेर काढतो की नाही बघा, पण अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं. आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला घाबरत नाही आणि आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही,” असंही मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी