33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'चल रे खोक्या टुनुक टुनुक'

‘चल रे खोक्या टुनुक टुनुक’

 

राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका येत आहेत. यामुळे आता सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका करत आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. आशातच काही दिवसांआधी शिंदे गटाच्या आमदार आपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धक्कादायक निकाल दिला असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. तर खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यामुळे हा निकाल खोटा असल्याचा दावा शिवसैनिक करताना दिसत आहेत.

अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. एक ते दोन वर्षांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदारांना घेत भाजपसोबत युती केली. यावेळी शिंदे गटातील एका आमदाराला ५० कोटी मिळाल्याचा दावा ठाकरे गटाकडून होत होता. यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटावर खोके सरकार अशी अनेकदा टीका केली आहे. अशातच आता सुषमा अंधारे यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेमध्ये ‘चल रे खोक्या टुनुक टुनुक’ अशी मिश्कील टीका केली आहे.

हे ही वाचा

‘राम एक नाही, ‘ब्रिटीश म्युझियममधील राम वेगळा’

शिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली पदव्युत्तर पदवी

उद्योगधंद्यांसह आता बॉलिवूडकरांचा फिल्मफेअर सोहळा गुजरातला

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद झाली असता, यावेळी सुषमा अंधारे यांनी सत्तधारी पक्षावर आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. महापत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्या म्हणाल्या की लवकरच राज्यस्तरीय दौरे आखले जाणार आहेत. लवकरच सविस्तर माहिती देऊ तसेच आम्ही चल रे भोपळ्या टुनुक म्हणायचो सध्याच्या राजकारणामध्ये चल रे खोक्या टुनुक टुनुक आहे’, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

राहुल नार्वेकरांवर टोला

राहुल नार्वेकरांनी सारवासारव परिषद घेतली आहे. राहुल नार्वेकर गिरे तो भी टांग उपर असं समजत आहेत. ते खोट्याचं खरं करत आहेत. शिवसेना नेते गजानन किर्तिकर आण रामदास कदम हे नेते क्रमांक एकवर होते. आता ते क्रमांक पाचवर गेले असून वाईट वाटतं असं अंधारे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी