22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमनोरंजनउद्योगधंद्यांसह आता बॉलिवूडकरांचा फिल्मफेअर सोहळा गुजरातला

उद्योगधंद्यांसह आता बॉलिवूडकरांचा फिल्मफेअर सोहळा गुजरातला

 

राज्यातच नाही तर अवघ्या देशामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. या पक्षाकडून अनेक देशवासियांना अनेक अपेक्षा आहेत. मात्र या अपेक्षांची पायमल्ली होत असल्याचं अनेकदा विरोधी पक्षाकडून बोललं जात आहे. अशातच आता देशामधील इतर राज्यातील विविध उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात आहेत. त्यातली त्यात महाराष्ट्र राज्य हे केंद्रस्थानी आहे. राज्यातील अनेक उद्योगधंदे हे गुजरातला घेऊन जाण्यात आले आहेत. यामुळे आता राज्यातील विरोधीपक्षनेत्यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर आता काही दिवसांआधी भाजपने महानंदा दुध देखील गुजरातला नेलं आहे. अशातच आता मुंबईमध्ये बॉलिवूड कलाकारांसाठी खास आयफा अवॉर्ड्सचा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र आता हा कार्यक्रम गुजरातला होणार असल्याची माहिती बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यामुळे आता मनोरंजन क्षेत्रामध्ये यावर कोण काय बोलणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यातून अनेक रोजगार आणि उद्योगधंदे हे गुजरातमध्ये घेऊन जाण्यात आले आहेत. अशातच आता हिंदी सिनेसृष्टीमध्ये वर्षातून एकदा आयफा पुरस्कार सोहळा होत असतो. त्या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक कलाकार मंडळींना आयफा अवॉर्ड मिळावा असं स्वप्न असतं. याच पुरस्काराचा कार्यक्रम गेली काही वर्षांपासून मुंबईमध्ये होत आहे. मात्र आता हा सोहळा गुजरातमध्ये होत आहे. २०१८ पासून २०२३ पर्यंत आयफा अवॉर्ड हा मुंबईमध्ये झाला. तर यापैकी २०२० या वर्षात गुवाहाटीला झाला. यंदाचा आयफा हा २०२४ या वर्षी गुजरातला होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख देखील ठरली आहे.

हे ही वाचा

‘भारतीय जनता पार्टीचे मुळ नाव हे ‘जनसंघ’

‘देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आम्ही शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही’

टीम इंडियाचा रिंकू नंबर वन फिनिशर होण्यामागे धोनीचा हात

‘या’ दिवशी होणार पुरस्कार सोहळा

२७ आणि २८ जानेवारी दिवशी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी करण जोहरवर सूत्रसंचलनाची जबाबदारी असणार आहे. या सोहळ्यामध्ये २०२३ या वर्षामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांचा मानसन्मान करत त्यांना गौरवण्यात येणार आहे.

‘हे’ कालाकर करणार नृत्याचं सादरीकरण

करीना कपूर खान, रणबीर कपूर, वरूण धवन, जान्हवी कपूर, सारा अली खान हे कालाकार आपल्या नृत्याने पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढवतील. यासाठी आकर्षण म्हणून फॅशन शोचं देखील आयोजन केलं आहे. तांत्रिक पुरस्कार सोहळ्याचं वितरण हे पहिल्या दिवशी होणार असून सिनेकलाकारांचे पुरस्कार वितरण हे दुसऱ्या दिवशी होणार आहे. करण जोहरसह आयुष्माण खुराना आणि मनीष पॉल हे सह-सूत्रसंचालक आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी