28 C
Mumbai
Sunday, February 16, 2025
Homeमनोरंजनशिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली...

शिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली पदव्युत्तर पदवी

 

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे दोघंही अनेकदा सोशल मीडियावर अनेक कारणानं चर्चेत असतात. काही दिवसांआधी ट्विंकल खन्नाचा सायकल चालवण्याचा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत होत आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या. या दोघांच्याही जीवनामध्ये अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या. मात्र ते दोघेही सध्या खुश असताना दिसत आहेत. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘एज जस्ट नंबर’, अर्थातच वय म्हणजे केवळ एक आकडा आहे. माणसाला एखादी गोष्ट करण्यासाठी वयाची आवश्यकता नसते. हिच बाबा अक्षय कुमारची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नाबाबतीत घडली आहे. ट्विंकल खन्नाने आपल्या वयाच्या ५० व्या वर्षी मास्टर्स पदवी संपादन केली आहे. यामुळे आता ट्विंकल खन्नाची जोरदर चर्चा सुरू आहे.

अनेकदा वयानुसार सर्वच गोष्टी हव्या असतात, असं अनेकदा अनेकांना वाटत असतं. मात्र वय हे एक केवळ जगण्याचा आलेख मोजत असतं. मात्र एखादी कोणतीही गोष्ट आत्मसात करायला कसलंही वयाचं बंधन नसतं. हेच अक्षय कुमारची पत्नी ट्वंकल खन्नानं करून दाखवलं आहे. अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम हॅंडेलवर त्याचा आणि पत्नी ट्विंकल खन्नाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ट्विंकल खन्नाने हिरव्या रंगाची साडी घातली आहे. त्यावर काळ्या रंगाचा पदवी उत्तीर्ण गाऊन परिधान केलेला दिसत आहे. अक्षयने ही बातमी मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने चाहत्यांशी शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर सुपरवुमन असं कॅप्शन दिलं आहे.

हे ही वाचा

उद्योगधंद्यांसह आता बॉलिवूडकरांचा फिल्मफेअर सोहळा गुजरातला

‘भारतीय जनता पार्टीचे मुळ नाव हे ‘जनसंघ’

‘देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आम्ही शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही’

‘मी एका सुपर वुमनशी लग्न केलं’

शेअर केलेल्या फोटोवर अक्षय कुमारने लिहिलं की, ‘दोन वर्षांपूर्वी जेव्हा तु मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असं सांगितलं. यावेळी मला वाटलं की तु खरोखरचं याबाबत गंभीर आहेस की नाही? पण ज्या दिवशी मी पाहिलं की तू खूप मेहनत करत आहेस. घर आणि करिअरसोबत मुलांनाही सांभाळत आहेस. यामुळे तुझं विद्यार्थी जीवनही चांगलं जात आहे. मला वाटतं की मी एका सुपरवुमनशी लग्न केलं आहे.’

‘मी थोडा आणखी अभ्यास केला असता तर…’

अक्षय कुमारने आपल्या पत्नीचं भरभरून कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, ‘मी देखील आज एवढं शिक्षण घेतलं असतं आणि अजून अभ्यास केला असता. मला तुझा अभिमान आहे. तुझा मला अभिमान आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द अपूरे आहेत’.

ट्विंकल खन्नाची कोणती पदवी?

ट्विंकल खन्नानं लंडन युनिव्हर्सिटीतून गोल्डस्मिथ्समधून फिक्शन रायटरचा अभ्यास पूर्ण केला आहे. गेल्या महिन्यामध्ये तिमं चाहत्यांसाठी विद्यापिठाची व्हिडीओ क्लिप शेअर केली. ट्विंकल आणि तिचा मुलगा आरव देखील त्याच विद्यापिठातून शिक्षण घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी