34 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeमहाराष्ट्र'राम एक नाही, 'ब्रिटीश म्युझियममधील राम वेगळा'

‘राम एक नाही, ‘ब्रिटीश म्युझियममधील राम वेगळा’

 

देशामध्ये सध्या प्रभू श्रीरामाच्या आयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला काहीच दिवस शिल्लक आहेत. २२ जानेवारी दिवशी श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरातून अनेक भक्तगण आणि उद्योजक, कलाकार, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपासून राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याआधी रामावर अनेक नेत्यांनी वक्तव्य केली होती. यामुळे राम मंदिराचा मुद्दा आता सर्वाधिक लोकांसमोर येत आहे. यामुळे राम मंदिराची चर्चा देखील सर्वत्र आहे. मात्र उद्घाटनाआधी प्रभू श्रीराम अनेकांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हा बहुजनांचा असून तो मांसाहारी होता असं वक्तव्य केलं यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता लेखक भालचंद्र नेमाडे यांनी राम एक नाही, सर्वांचा राम वेगळा असल्याचं सांगितलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

काही दिवसांआधी जितेंद्र आव्हाड यांनी राम हा मांसाहारी होता आणि तो बहुजन असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मात्र आशातच हा मुद्दा निवळत असताना, आता लेखक आणि ज्ञानपीठ विजेतेकार भालचंद्र नेमाडे यांनी श्रीरामावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे आता भालचंद्र नेमाडे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ‘वाल्मिकींचा राम खरा काशावरून म्हणायचा’? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘लेखकाला न दिसणारं सत्य आता समोर सापडलं पाहिजे’, असं ते म्हणाले आहेत. ‘राम हा मांसाहारी होती की शाकाहारी होता हे वाचूनच लक्षात येत’ असं वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं होत.

हे ही वाचा

शिक्षणाला वय नसतं, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं ५० व्या वर्षी मिळवली पदव्युत्तर पदवी

उद्योगधंद्यांसह आता बॉलिवूडकरांचा फिल्मफेअर सोहळा गुजरातला

‘देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आम्ही शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही’

‘खरे राम कोणते’?

जळगावमध्ये ते एका ठिकाणी बोलत असताना त्यांनी वाल्मिकीचा खरा राम कशामुळे म्हणायचा? असा सवाल आता उपस्थित केला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी ब्रिटीश म्युझियम आणि रामायणाबरोबर आसाम आणि इतर रामायणाचा संदर्भ दिला आहे. राम हा केवळ मांसाहारी होता की शाकाहारी हे पाहताना ते प्रत्यक्ष खोदून पाहता आलं पाहिजे असं वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी वक्तव्य केलं आहे.

‘राम शाकाहारी आहेत की मांसाहारी’?

थ्री हंड्रेड रामायण या कादंबरीचा संदर्भ देत भालचंद्र नेमाडे यांनी ‘राम हा मांसाहारी होता की शाकाहारी होता, हे पाहण्यापेक्षा त्यातील खोलात जावून चर्चा केली पाहिजे’ असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी ‘कंबोडीयातील राम वेगळा आहे.तर आसाममधील रामायणामध्ये सीता मुख्य भूमिकेत असल्याचं’ नेमाडे म्हणाले आहेत.

‘आसामच्या रामायणामध्ये सीता मुख्य आहे’

‘आसाममधील रामायणातील सीता ही मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करते. ती शिव्या देते. रामाला अक्कल नाही असं ते मराठीमध्ये आलं पाहिजे. ते सगळं प्रोजेक्ट आलं तरीही कंबनाचं रामायण का खरं नाही? सगळीच रामायण माहिती पाहिजे. नुसतंच एक रामायण नाही’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी