28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'सरकारला फुटला घाम'; युवा संघर्ष यात्रेचं फेसबुक पेज हॅक

‘सरकारला फुटला घाम’; युवा संघर्ष यात्रेचं फेसबुक पेज हॅक

राज्यात २४ ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आणि मोठा प्रतिसाद मिळाला आहे.  या प्रतिसादाने सरकारची पळताभुई थोडी झाली आहे. ही युवा संघर्ष यात्रा युवकांच्या भविष्यासाठी होती. कंत्राटी भरतीविरोधात संघर्ष यात्रेचं काम सुरु असून या यात्रेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका देखील केली होती. मात्र आता या संघर्ष यात्रेला सरकारने टार्गेट केल्याचं दिसत आहे. (१२ डिसेंबर) दिवशी युवा संघर्ष यात्रेचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सरकारला घाम फुटला असून युवा संघर्ष यात्रेचं फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. सरकाने हा रडीचा डाव खेळला असल्याचा दावा आता राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी केला आहे.

युवा संघर्ष यात्रेचा उद्घाटन सोहळा ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर युवा संघर्ष यात्रेचा अंतिम टप्पा हा नागपूर येथे असणार आहे. ८०० किमीचा हा अंतिम टप्पा पूर्ण होणार असून युवा संघर्ष यात्रेला मोठं यश मिळालं आहे. या यात्रेवरून सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा रोहित पवारांवर टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कर्जतच्या (अजित पवार गट) राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या शिबिरात अजित पवारांनी रोहित पवारांवर संघर्ष यात्रेवरुन टीका केली होती. एवढा संघर्ष करून दमला का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा

देशात डेंग्यूचं सावट; राज्य तिसऱ्या क्रमांकावर

वूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली ‘या’ संघाने मोजले कोट्यवधी

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर

याच संघर्ष यात्रेचा अंतिम टप्पा हा (१२ डिसेंबर) असणार असून यापूर्वीच सरकारने युवा संघर्ष यात्रेचं फेसबुक पेज हॅक केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली असून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. युवा संघर्ष यात्रेनं विरोधकांची घाबरगुंडी उडवली असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हाणाले रोहित पवार?

‘युवा संघर्ष यात्रे’च्या प्रतिसादाने विरोधकांची घाबरगुंडी उडालीय. तब्बल ८०० कि.मी.हून अधिक अंतर पायी चालत पूर्ण करणाऱ्या युवा संघर्ष यात्रेचा उद्या मविआच्या नेत्यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप होतोय.. हा संघर्ष लोकांपर्यंत पोहचू नये यासाठी रस्त्यावरील लढाईला घाबरणाऱ्या सरकारप्रणीत तथाकथिक शक्तीला घाम फुटल्याचं दिसतंय… म्हणूनच ‘युवा संघर्ष यात्रे’चं फेसबुक पेज हॅक करण्याचा रडीचा डाव खेळला गेला… पण त्यांनी विसरू नये.. आता संघर्ष अटळ आहे… आणि गाठ युवा शक्तीशी आहे. असे म्हणत रोहित पवारांनी सरकारविरोधात टीकेचे बाण सोडले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी