देशात ख्रिश्चन धर्माची संख्या सर्वाधिक कमी असली तरीही नाताळ हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सण फार महत्त्वाचा आणि आनंद देणारा आहे. त्याचप्रमाणे नाताळ सणाबरोबर ३१ डिसेंबर हा दिवस नवीन वर्षाचे स्वागत करत जुन्या वर्षाला गुड बाय म्हणत साजरा केला जातो. या सणासोबतच तरूणांना आणि मध्यप्राशन करणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा दिवस असून वर्षभराचे सर्व दुख विसरून बेभान होतात. यामुळे आता राज्य सरकारने मध्यप्राशन करणाऱ्या मंडळींसाठी एक नाही दोन नाही तर पहाटे पाच वाजेपर्यंत बार सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. यामुळे आता मध्य पिणाऱ्यांच्या गगणात आनंद मावेनासा झाला आहे. २४, २५ आणि ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत हॉटेल, बार आणि वाईन शॉप सुरू ठेवणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे.
नाताळ सण हा जगभरामध्ये साजरा केला जातो. देशामध्ये सर्वधर्मसमभाव हा संदेश लक्षात घेत देशभरामध्ये इतरही सण साजरे करतात. अशातच नाताळ संपल्यानंतर लगेच ३१ डिसेंबरही येत आहे. यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि जुन्या वर्षातील आठवणी ताज्या ठेवण्यासाठी देशभरात ३१ डिसेंबर साजरा केला जातो. अनेकजण स्वत:चा वेळ आपल्या कुटुंबाला देतं. त्याचप्रमाणे अनेकजण आपला वेळ मित्रांसोबत घालवतात. या दिवशी अनेक मंडळी दारू पिऊन चिल मारतात. या दिवशी दारू, बिअर तसेच अन्य वस्तू विकत घेतल्याने राज्याच्या आर्थिक विकासात वाढ होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा
साक्षी मलिकची कुस्ती क्षेत्रातून राजीनाम्याची घोषणा
भारत-पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार ‘या’ दिवशी; तारीख आली समोर
धनुष्यबाणाच्या चिन्हावर भाजपसोबत शिंदे गट निवडणूक लढवणार; अमित शाहांसोबत बातचीत
राज्याचे आर्थिक उत्पन्न शुल्क वाढवण्यासाठी राज्य शासनाने पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स, बिअर बार, रेस्टॉरंट खुले ठेवण्याचा मानस केला आहे. याआधीच्या ठाकरे सरकारनेही कोरोना काळात वाईन शॉप सुरू ठेवले होते. त्या सरकारनेही राज्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा हेतू असल्याचं सांगत वाईन विक्रिवर निर्बंध आणले नव्हते.
परवानगी रद्द होऊ शकते
गृहविभागाने हा आदेश जारी केला आहे. ठरवून दिलेल्या वेळेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात यावी नाहीतर जिल्हाधिकारी वेळेच्या शिथीलतेबाबत निर्णय घेऊ शकतात. वेळेबाबत दिलेली सूट रद्द होऊ शकते.